वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेंतर्गत मार्च 2024 पर्यंत 14 क्षेत्रांमध्ये 755 अर्जांच्या मंजुरीसह, 1.23 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक


मुक्त व्यापार करार ही दुतर्फी प्रक्रिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झालेले चार मुक्त व्यापार करार (एफटीए) न्याय्य आणि भारताच्या हिताचे आहेत: पीयूष गोयल

Posted On: 30 JUL 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2024
 

नरेंद्र मोदी सरकारने आत्तापर्यंत चार मुक्त व्यापार करारांवर (एफटीए) स्वाक्षरी केल्या आहेत. संबंधितांशी यासंदर्भात व्यापक सल्लामसलतीनंतर सरकारने या उपयुक्त वाटाघाटी पूर्ण केल्या असून या आधीच्या केंद्र सरकारांना हे जमलेले नाही, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले.

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर परिषद आयोजित केली होती. गोयल यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.

प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारीत (आरसीइपी)  सहभागी  होण्याचा निर्णय रास्त नसल्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय भारताने घेतला, असे ते म्हणाले.

गेल्या 10 वर्षातील सरकारच्या यशाबद्दल गोयल म्हणाले की, उद्योग क्षेत्र आणि लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेले  परिवर्तन  जाणले  आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी, परकीय चलन साठा दुप्पट झाला आहे आणि चालू खात्यातील तूट लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. एका चांगल्या सरकारमुळे कसे आमूलाग्र बदल घडतात याचे हे उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी केलेल्या भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटना  यांच्यातील मुक्त व्यापार करारात सवलतींशी संबंधित 100 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची वचनबद्धता आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुक्त व्यापार कराराला झपाट्याने चालना मिळण्यासाठी आणि गुणवत्ता नियंत्रण  आदेशांचा (QCOs) चा वापर उद्योग क्षेत्राच्या कल्याणासाठी आणि दर्जा वाढवण्यासाठी उद्योगांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. "गुणवत्तेची हमी देणारे हे आदेश दर्जामुळे मालाची बाजारपेठेतील मागणी वाढवण्यात मदत करतील आणि निकृष्ट वस्तू बाजारात येणार नाहीत, याची काळजी घेतील", असे मत गोयल यांनी मांडले.अनुपालन ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

सरकार देशभरात 12 नवीन औद्योगिक पार्कची स्थापना करत आहे आणि 5-6 मेगा टेक्सटाईल पार्क तयार केले आहेत असेही त्यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या सवलतींचा लाभ घेऊन भारतीय गुंतवणूकदारांनी स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) पाठिंबा देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले. “भारतासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे बदल घडवून आणुया”, असे त्यांनी सांगितले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात पाच कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये समावेश असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थांचे रूपांतर पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये करण्यात मोदी सरकारला यश आले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2039351) Visitor Counter : 59