अवजड उद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रिक वाहनांना चालना

Posted On: 30 JUL 2024 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2024

देशात इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालय सध्या खालील योजना राबवत आहे: -

500 कोटी रूपये खर्चासह 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 अशा 4 महिन्यांच्या कालावधीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (ईएमपीएस)-2024  e-2W आणि e-3W च्या खरेदीदारांना प्रोत्साहन देते.

ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनंट इंडस्ट्री (पीएलआय-एएटी) साठी उत्पादनाशी जोडलेल्या प्रोत्साहन योजनेसाठी 25,938 कोटी रुपये खर्चाची अर्थसंकल्पीय तरतूद. ही योजना e-2W, e-3W, e-4W, ई-बस आणि ई-ट्रकसह इलेक्ट्रिक वाहनांच्या विविध श्रेणींना प्रोत्साहन देते.

प्रगत रसायनशास्त्र सेल (पीएलआय-एसीसी) बॅटरी स्टोरेजच्या निर्मितीसाठी 18,100 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चासह उत्पादनाशी जोडलेली प्रोत्साहन योजना.

जागतिक ईव्ही उत्पादकांकडून गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आणि भारताला ई-वाहनांसाठी उत्पादन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी भारतात इलेक्ट्रिक पॅसेंजर कारच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याची योजना.

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढील उपक्रमही हाती घेतले आहेत: –

i.इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर/चार्जिंग स्टेशनवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 5% पर्यंत कमी केला आहे.

ii.बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना हिरव्या रंगाची परवाना प्लेट देण्यात येणार असून त्यांना परमिटसाठी आवश्यक नियमांमधूनही सूट मिळेल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घोषित केले आहे.

iii.या मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून राज्यांना इलेक्ट्रिक वाहनांवरील रस्ते कर माफ करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा प्रारंभिक खर्च कमी होण्यास मदत होईल.

भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांचा जलद स्वीकार  आणि उत्पादनासाठी योजनेच्या I आणि II टप्प्यांअंतर्गत 2015 पासून केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना अनुदान  देत आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (इएमपीएस)- 2024 अंतर्गत, e-2Ws आणि e-3Ws च्या खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी किमतीत कपात रूपाने प्रोत्साहन/अनुदान  दिले जाते.

अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2039133) Visitor Counter : 65