संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण अधिग्रहण परिषदेने भारतीय लष्कर आणि भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमता वाढवण्यासाठी भांडवल अधिग्रहणाच्या प्रस्तावांना दिली मंजुरी


सशस्त्र लढाऊ वाहनांसाठी प्रगत लँड नेव्हिगेशन प्रणाली आणि 22 इंटरसेप्टर बोटींच्या खरेदीला दिली आवश्यक मान्यता

Posted On: 29 JUL 2024 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2024


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी ) ची एक बैठक 29 जुलै 2024 रोजी झाली, ज्यामध्ये विविध भांडवल अधिग्रहण प्रस्तावांवर विचार करण्यात आला. भारतीय लष्कराच्या सशस्त्र लढाऊ वाहनांसाठी प्रगत लँड नेव्हिगेशन प्रणालीच्या खरेदीसाठी आवश्यक मान्यता देण्यात आली. ही प्रणाली उच्च दर्जाच्या एन्क्रिप्शनसह कुठल्याही फसवणुकीपासून सुरक्षित आहे.

ALNS Mk-II हे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GLONASS) व्यतिरिक्त भारतीय प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली, भारतीय नक्षत्र (IRNSS, NavlC) वापरून नेव्हिगेशन या प्रणालींशी सुसंगत आहे. ALNS Mk-II संरक्षण मालिकेतील नकाशांशी सुसंगत आहेत , ज्यामुळे सशस्त्र लढाऊ वाहनांसाठी नेव्हिगेशनल ऍप्लिकेशन्समध्ये उच्च पातळीची अचूकता येते. हे उपकरण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), चेन्नई कडून [भारतात रचना, विकास आणि निर्मिती (lDDM)] श्रेणी अंतर्गत खरेदी केले जाईल.

भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढवण्यासाठी, डीएसी ने समुद्रात उथळ पाण्यात कारवाई करण्यास सक्षम असलेल्या अत्याधुनिक प्रणालीने सुसज्ज 22 इंटरसेप्टर बोटींच्या खरेदीसाठी आवश्यक मंजुरी दिली. या बोटी वैद्यकीय बाबीसाठी स्थलांतर करण्यासह किनारपट्टीवर देखरेख  आणि गस्त घालणे, शोध आणि बचाव कार्यासाठी वापरल्या  जातील.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2038588) Visitor Counter : 60