पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
एलपीजी ग्राहकांचे आधार-आधारित प्रमाणीकरण, पहल आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर अधिक केंद्रित होण्यास सक्षम करते
Posted On:
25 JUL 2024 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2024
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) अंतर्गत, सरकार गरीब घरातील प्रौढ महिलांना ठेव मुक्त एलपीजी जोडणी प्रदान करते. याशिवाय, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) सर्व ग्राहकांना 14.2 किलो सिलिंडरवर 300 रुपयांचे लक्ष्यित अनुदान (आणि 5 किलो सिलिंडरसाठी प्रमाणानुसार प्रो-रेट केलेले) 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलोच्या समतुल्य घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी प्रदान केले जात आहे. याव्यतिरिक्त, विविध राज्य सरकारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना अनुदानित रिफिल किंवा अतिरिक्त अनुदान देखील प्रदान करत आहेत.
01.07.2024 पर्यंत, पहल (PAHAL) योजनेअंतर्गत 30.19 कोटींहून अधिक LPG ग्राहकांची नोंदणी झाली आहे. पहल योजनेअंतर्गत, एलपीजी सिलिंडर विनाअनुदानित किमतीत विकले जातात आणि एलपीजी ग्राहकांना लागू असलेले अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. हे अनुदान एकतर आधार ट्रान्सफर कंप्लायंट (ATC) किंवा बँक ट्रान्सफर कंप्लायंट (BTC) पद्धतीने हस्तांतरित केले जाते.
हे फायदे पात्र आणि लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कार्यक्षम पद्धतीने आणि वेळेवर पोहोचतील याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. योजनांचे पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा (DBT) करणाऱ्या योजनांसाठी आधार आधारित प्रमाणीकरण हे अभिप्रेत लाभार्थ्यांना लाभाचे लक्ष्यित वितरण करण्यासाठी त्यांचे अचूक, रिअल-टाइम आणि किफायतशीर ओळख, प्रमाणीकरण आणि डी-डुप्लिकेशन सक्षम करते.
ग्राहकांचे प्रमाणीकरण वाढविण्यासाठी, सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना (OMCs) प्रधानमंत्री उज्वला योजना आणि पहल लाभार्थींचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देश जारी केले होते.
ग्राहक त्यांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण विविध पद्धतींद्वारे पूर्ण करू शकतात.यामध्ये त्यांच्या संबंधित तेल विपणन कंपन्या (OMC) द्वारे प्रदान केलेल्या मोबाईल ऍप्लिकेशन्सचा वापर समाविष्ट आहे. हा पर्याय सुविधा आणि लवचिकता प्रदान करतो, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार, वितरकाला भेट न देता, त्यांच्या स्मार्ट फोनचा वापर करून प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करता येते. ग्राहक त्यांच्या सिलेंडर वितरणाच्या वेळी देखील बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करू शकतात. ही पद्धत ग्राहकांना कोणत्याही ठिकाणाला भेट न देता प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी देते. जे ग्राहक सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी घरी उपलब्ध नसतील किंवा वैयक्तिकरित्या प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य देत असतील ते त्यांच्या एलपीजी वितरकांच्या शोरूमला भेट देऊन प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय देखील निवडू शकतात.
सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही उपलब्ध पद्धतीचा वापर करून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.हा लवचिक दृष्टीकोन हे सुनिश्चित करतो की ग्राहक त्यांच्या वैयक्तिक पसंती आणि परिस्थितीला अनुकूल अशी पद्धत आणि वेळ निवडू शकतात.विकसित भारत संकल्प यात्रा शिबिरांमध्ये लक्षणीय संख्येने बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (35 लाखांहून अधिक PMUY लाभार्थी) यशस्वीरित्या पार पडले आहे.सध्या सुरू असलेल्या एलपीजी सुरक्षा तपासणी किंवा शिबिराचा एक भाग म्हणून ग्राहकांच्या दारात जाऊन प्रमाणीकरण करण्याचा उपक्रम राबवला जात आहे.ज्या ग्राहकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झाले नाही अशा ग्राहकांची कोणतीही सेवा किंवा लाभ खंडित करण्यात आलेला नाही.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2037144)
Visitor Counter : 95