भारतीय स्पर्धा आयोग
सनलाम इमर्जिंग मार्केट्स (मॉरिशस) लिमिटेड द्वारे श्रीराम जीआय होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड मधील 16.12% समभाग संपादनाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी
Posted On:
24 JUL 2024 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2024
भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) सनलाम इमर्जिंग मार्केट्स (मॉरिशस) लिमिटेड द्वारे श्रीराम जीआय होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड मधील प्रस्तावित 16.12% समभाग संपादनाला मंजुरी दिली आहे.
या व्यवहारामध्ये, सनलाम इमर्जिंग मार्केट्स (मॉरीशस) लिमिटेड कडून श्रीराम जीआय होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड (एसजीआयएच) मधील सध्याच्या भागधारकांकडील 16.12% समभाग संपादन करण्याचा प्रस्ताव आहे.
एसजीआयएच ही श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एसजीआयएच) ची प्रवर्तक आणि होल्डिंग (मालक) कंपनी आहे.
एसईएमएम ही मॉरिशसमध्ये स्थापन करण्यात आलेली, सनलाम लिमिटेड, दक्षिण आफ्रिका, या कंपनीची 100% उपकंपनी असून, ती सनलाम ग्रुपचा भाग आहे.
सीसीआय बाबतचा सविस्तर आदेश जारी करण्यात येईल.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2036594)