रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतात रस्ते अपघातांमुळे झालेले मृत्यू
Posted On:
24 JUL 2024 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2024
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे, वर्ष 2018 ते 2022 या कालावधीत देशातील रस्ते अपघातांमुळे झालेल्या मृत्यूची एकूण संख्या खालील तक्त्यामध्ये दिली आहे: -
वर्ष
|
एकूण मृतांची संख्या
|
2018
|
1,57,593
|
2019
|
1,58,984
|
2020
|
1,38,383
|
2021
|
1,53,972
|
2022
|
1,68,491
|
मंत्रालय हे मृत्यूच्या स्वरूपाबाबत माहिती/डेटा संकलित करत नसले तरी, कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनांनुसार वर्गीकृत केलेल्या भारतातील रस्ते अपघातांमुळे झालेल्या मृत्यूची संख्या खालील तक्त्यामध्ये दिली आहे: -
अनुक्रमांक
|
वाहतूक नियमांचे उल्लंघन |
वर्ष 2022 मध्ये मृतांची संख्या |
1
|
वेग मर्यादेचे उल्लंघन
|
1,19,904
|
2
|
दारू पिऊन वाहन चालवणे/अल्कोहोल आणि अंमली पदार्थांचे सेवन
|
4,201
|
3
|
चुकीच्या बाजूने वाहन चालवणे
|
9,094
|
4
|
लाल सिग्नल ओलांडणे
|
1,462
|
5
|
गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे
|
3,395
|
6
|
इतर
|
30,435
|
|
एकूण
|
1,68,491
|
स्टॉकहोम करारातील आपल्या बांधिलकीनुसार, भारत सरकारने 2030 पर्यंत रस्त्यावरील मृत्यू आणि जखमींचे प्रमाण 50% हून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 4ई म्हणजे एज्युकेशन (शिक्षण), इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) (रस्ते आणि वाहने दोन्ही), एन्फोर्समेंट (अंमलबजावणी) आणि इमर्जन्सी केअर (आपत्कालीन सेवा) असा बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यानुसार, परिशिष्टात तपशीलवार नमूद केल्याप्रमाणे मंत्रालयाने विविध उपक्रम सुरु केले आहेत. तसेच, रस्ता आणि वाहन सुरक्षेशी संबंधित अधिसूचना सर्व संबंधित हितधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर वेळोवेळी अधिसूचित केल्या जातात.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2036427)
Visitor Counter : 138