रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
आज संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प, आधुनिक पायाभूत सेवा सुविधा, नवोन्मेषता आणि आधुनिक कालानुरूप आवश्यक सुधारणांसह समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करत, समृद्ध भविष्याचा मार्ग दाखवणारा दूरदर्शी अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली अर्थसंकल्पाची प्रशंसा
Posted On:
23 JUL 2024 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2024
केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प,आधुनिक पायाभूत सेवा सुविधा,नवोन्मेषता आणि आधुनिक कालानुरूप आवश्यक सुधारणांसह समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करत, समृद्ध भविष्याचा मार्ग दाखवणारा दूरदर्शी अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावर संदेश लिहिला असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनापासून आभार मानत,त्यांचे अभिनंदनही केले आहे.हा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या विकासाची गतीमय विस्तृत रुपरेषा असून,या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढण्याचे, रोजगाराच्या संधी वाढण्याचे, कौशल्यवृद्धी साधता येण्याचे, मनुष्यबळात वृद्धी होण्याचे आणि सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
हा अर्थसंकल्पामुळे उत्पादन आणि सेवा क्षेत्र, शहरी भागांचा विकास आणि ऊर्जा सुरक्षा क्षेत्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सेवा सुविधा,नवोन्मेष, संशोधन आणि पुढच्या नव्या आधुनिक कालानुरूप भर दिला गेला आहे, त्यामुळेच हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रांमध्ये भारताच्या उल्लेखनीय प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा अर्थसंकल्प आहे असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता उज्ज्वल,समृद्ध भविष्य आपल्या सर्वांची वाट पाहत आहे असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.दूरदृष्टीने मांडलेला हा अर्थसंकल्प, देशाच्या शाश्वत विकास,नवोन्मेष आणि चिरकाल टिकणाऱ्या विकासाला चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि समृद्ध भविष्य असलेला भारत घडेल याचीच सुनिश्चिती झाली आहे असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
Jaydevi PS/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2035878)
Visitor Counter : 81