कायदा आणि न्याय मंत्रालय

येत्या बुधवारी 25 जुलै 2024 रोजी "2024-25 साठी अर्थसंकल्पीय योजना: न्यायदानाला बळकटी देणे - भारताचे बळकटीकरण" या विषयावर वेबिनारचे आयोजन


केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल हे न्याय विभागाच्या संदर्भात 2024-25 च्या अर्थसंकल्पीय योजनांवरील वेबिनारचे उद्घाटन करतील

Posted On: 22 JUL 2024 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024

 

विधि आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाच्या संदर्भात ‘2024-25 साठीच्या अर्थसंकल्पीय योजना’ या विषयावर बुधवारी  24 जुलै 2024 रोजी एक वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल या वेबिनारचे उद्घाटन करतील. या वेबिनारचा उद्देश न्याय विभागाच्या विविध विभागांसाठी मुख्य अर्थसंकल्पीय तरतुदींवर चर्चा करणे आणि त्यावर विचार-विनिमय करणे हा आहे आणि त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या आणि नवीन प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी कशी सुलभ रीतीने करता येईल यावर विचार करणे हा आहे. त्याचबरोबर या वेबिनारमध्ये प्रामुख्याने चार सत्रे असतील ज्यात सर्वोत्तम कार्यपद्धती,न्यायिक अंतर्दृष्टी आणि प्रक्रियात्मक नवकल्पनांवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे देशभरातील सर्वांसाठी न्यायदानाची प्रक्रिया उपलब्ध असणे आणि योग्य न्याय मिळणे हे सुनिश्चित करता येईल.

 
S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2035343) Visitor Counter : 10


Read this release in: Urdu , English , Hindi