कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सात दशकांपासून नाकारलेले नागरिकत्व दिल्याबद्दल पश्चिम पाकिस्तानी विस्थापितांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे आभार


पश्चिम पाकिस्तानी विस्थापित संघटनेचे अध्यक्ष लाभा राम गांधी यांनी घेतली केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट

प्रविष्टि तिथि: 18 JUL 2024 6:44PM by PIB Mumbai

सात दशकांपासून नाकारलेले नागरिकत्व दिल्याबद्दल पश्चिम पाकिस्तानी विस्थापितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे आभार मानले आहेत. पश्चिम पाकिस्तानी विस्थापित संघटनेचे अध्यक्ष लाभा राम गांधी यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची आज नवी दिल्ली इथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी आभार व्यक्त केले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या भेटीत विस्थापितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. विस्थापनाच्या अवघड काळात भक्कम पाठींबा दर्शवल्याबद्दल आणि सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. “आमचे कल्याण लक्षात घेत आम्हाला सामावून घेताना भारतीय समाजाने दर्शवलेले प्रेम आणि औदार्य हृदयस्पर्शी असल्या”ची भावना त्यांनी व्यक्त केली.

गेली सात दशके झालेल्या अन्यायाचा उल्लेख करून संघटनेने पूर्वीच्या सरकारांनी आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. 1947 मध्ये फाळणी झाल्यामुळे पश्चिम पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेले विस्थापित जम्मू कश्मिरमधील प्रामुख्याने जम्मू, कथुआ व राजौरी या जम्मू विभागातील जिल्ह्यांमध्ये वसले. सुमारे 5,764 कुटुंबे फाळणीनंतर जम्मूत स्थलांतरित झाली.

कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू कश्मिरमधील अनेक उपेक्षितांच्या मूक समस्यांची दखल घेतली गेली व त्यांना न्याय मिळाला, असे विस्थापितांनी म्हटले आहे.

***

SushmaK/ReshmaB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2034212) आगंतुक पटल : 101
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri