भूविज्ञान मंत्रालय
लक्षद्वीप, दमण दीव, दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट
Posted On:
17 JUL 2024 4:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2024
लक्षद्वीप, दमण दीव, दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी आज केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली आणि केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेद्वारे पिण्याच्या पाण्याचा अशा प्रकारचा जगातील पहिला “निःक्षारीकरण प्रकल्प” उभारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
केंद्रशासित प्रदेशातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवून मोठा दिलासा देणाऱ्या जगातील पहिल्या लो टेम्परेचर थर्मल डिसलायनेशन (LTTD) संयंत्राच्या स्थापनेबद्दल पटेल यांनी भूविज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे आभार मानले. एकूण 9 डिसलायनेशन प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी 7 कार्यान्वित झाले आहेत तर आणखी एक संयंत्र येत्या आठवड्यात कार्यान्वित होईल. या प्रत्येक लो टेम्परेचर थर्मल डिसलायनेशन (LTTD) युनिटची क्षमता दररोज सुमारे 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी क्षालन करण्याची आहे जी आगामी काळात 1.5 लाख लिटर प्रतिदिन केली जाईल.
डॉ जितेंद्र सिंह यांनी प्रफुल्ल पटेल यांना माहिती दिली की दोन पुनर्खनिजीकरण संयंत्र कार्यान्वित केले जात आहेत जे डिसलायनेशन प्रक्रियेदरम्यान बाष्पीभवनात क्षत झालेले आवश्यक क्षार पुन्हा त्यात मिसळतील. इतर डिसेलिनेशन युनिट्स किंवा संयंत्राना देखील कालांतराने अशीच पुनर्खनिजीकरण सुविधा पुरविली जाईल, असेही ते म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी लक्षद्वीपच्या विकासासाठी पंतप्रधानांची दूरदृष्टी अधोरेखित केली. “आगामी वर्षांमध्ये लक्षद्वीप हे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांमुळे रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रमुख केंद्र बनेल, असे त्यांनी सांगितले.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033847)
Visitor Counter : 88