कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उधमपूर जिल्हा प्रशासनासोबत घेतली आढावा बैठक

Posted On: 14 JUL 2024 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2024

 

"उधमपूर प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सार्वजनिक सुविधा वेळेत आणि अखंडपणे वितरीत करण्यासाठी कुठेही कोणतीही कसर बाकी ठेवता कमा नये," असे आज  केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तसेच अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी सलोनी राय, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि पंचायती राज संस्थांचे (पीआरआय) डझनभरपेक्षा जास्त प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक घेताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी पाणीटंचाई, वीज कपात, खराब रस्ते आणि अनधिकृत पार्किंग यासारख्या तातडीच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी शक्य तितक्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करताना त्यांनी सरकार जनतेच्या सेवेसाठी वचनबद्ध असल्याचे पुन्हा सांगितले आणि त्यांनी उचललेल्या सर्व पावलांचा उद्देश समाजातील सर्व लोकांचे जीवन सुलभ करणे आहे असे नमूद केले.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, 'राष्ट्र प्रथम' या मंत्रासह, मोदी सरकारचे शासन  जन-भागीदारी आणि संकल्प से सिध्दी  या भावनेने प्रेरित आहे. केंद्रीय मंत्र्यांनी डीसीसींना सार्वजनिक तक्रारी आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचा सहभाग सक्रिय करण्याचे आवाहन केले.”नगरसेवकांनी आजच्या बैठकीत उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत,” असे निर्देशदेखील त्यांनी दिले.

   

या आढावा बैठकीदरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी जिल्ह्यात सुवासिक फुलांच्या वनस्पती लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यावर भर दिला. पुढे त्यांनी सांगितले की, “या नवीन उद्योगात गुंतलेल्या स्टार्ट-अप्सने स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. सरकारला सर्वांना नोकरी देणे शक्य नाही, म्हणून, तरुणांनी उपजीविकेसाठी अशा इतर फायदेशीर मार्गांचा शोध घेतला पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला.

 

* * *

S.Patil/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033187) Visitor Counter : 39