रेल्वे मंत्रालय

46 रेल्वे गाड्यांमध्ये सामान्य वर्गाच्या 92 डब्यांच्या अंतर्भाव तर इतर 22 रेल्वे गाड्यांमध्येही डब्यांची संख्या वाढवण्याची योजना

Posted On: 12 JUL 2024 5:54PM by PIB Mumbai

 

सामान्य श्रेणीतील प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, भारतीय रेल्वेने 46 वेगवेगळ्या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवली असून या उद्देशाने 92 नवीन सामान्य श्रेणीचे डबे या गाड्यांना जोडण्यात आले आहेत.  याशिवाय, इतर 22 रेल्वे गाड्या निश्चित करण्यात आल्या आहेत आणि  त्या गाड्यांनाही लवकरच अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्याची योजना आखण्यात आली आहे.

ज्या रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामध्ये पुढील रेल्वे गाड्यांच्याही समावेश आहे.

15647/15648 गुवाहाटी लोकमान्य टिळक एक्सप्रेस,

16559/16590 बंगलोर शहर सांगली राणी चेन्नम्मा एक्सप्रेस,

12972/12971 भावनगर वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस,

19217/19218  वेरावळ जंक्शन मुंबई वांद्रे वेरावळ जंक्शन सौराष्ट्र जनता एक्सप्रेस,

22956/22955  मुंबई वांद्रे - भुज कच्छ सुपरफास्ट एक्सप्रेस,

20908/20907 भुज दादर सयाजी नागरी सुपरफास्ट एक्सप्रेस,

11301/11302 मुंबई बेंगळुरू उद्यान  एक्सप्रेस,

12111/12112  मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस,

12139/12140 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

 या आणि इतर  गाड्यांमध्ये बसवण्यात आलेल्या या अतिरिक्त डब्यांमुळे सर्वसामान्यांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032916) Visitor Counter : 32