मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्योद्योग विभागाने तामिळनाडूतील मदुराई येथे मत्स्यपालन उन्हाळी संमेलन 2024 चे केले आयोजन
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रमाणपत्रे, पीएमएमएसवाय उपलब्धी पुरस्कार पत्र वितरित केले आणि ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्सवर मत्स्य उत्पादक शेतकरी संघटनांचा सत्कार केला
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत 19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 114 कोटी रुपये खर्चाच्या 321 प्रभावी प्रकल्पाना दिली मंजुरी
Posted On:
12 JUL 2024 4:18PM by PIB Mumbai
मत्स्योद्योग क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील मार्गावर विचारमंथन करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी धोरणात्मक चर्चा करण्याच्या उद्देशाने, मत्स्यव्यवसाय विभागाने आज तामिळनाडूत मदुराई येथे 'फिशरीज समर मीट 2024' चे आयोजन केले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00107U2.jpg)
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 114 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 321 प्रभावी प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आणि पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मत्स्योद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि जॉर्ज कुरियन उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, उद्घाटन स्थळावरून मच्छीमार बांधवांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद आयोजित करण्यात आला.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0028IAC.png)
विविध मत्स्यपालन तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्र्यांनी केले. राजीव रंजन सिंह यांनी केसीसीचे वितरण देखील केले, लाभार्थ्यांना पीएमएमएसवाय उपलब्धी पुरस्कार पत्र दिली आणि ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्सवर नोंदणीकृत मत्स्य उत्पादक शेतकरी संघटनांचा सत्कार केला. प्रदर्शनाची पाहणी करताना त्यांनी उद्योजक आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003TOX4.png)
मत्स्योद्योग विभागाने पीएमएमएसवाय अंतर्गत 2195 मत्स्य उत्पादक शेतकरी संघटना तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे आणि सुमारे 95 संघटना ओएनडीसी नेटवर्कवर समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ओएनडीसी सोबतच्या या सहकार्यामुळे शेतकरी संघटनांना अनेक लाभ झाले असून त्यामध्ये व्यवहाराची कमी झालेली किंमत, वाढलेली बाजारपेठ, सुधारित पारदर्शकता, वाढलेली स्पर्धा आणि स्पर्धात्मकता, नवोन्मेष , रोजगार निर्मिती इ.चा समावेश आहे.
मत्स्योद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयसोबत मत्स्यव्यवसाय विभागाच्या स्थापनेला 2024 मध्ये पाच वर्षे पूर्ण झाली. स्थापनेपासून मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय मत्स्योद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी विविध धोरणात्मक उपक्रम हाती घेतले आहेत.
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![](http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg)
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2032852)
Visitor Counter : 54