ग्रामीण विकास मंत्रालय
दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानामुळे 90.76 लाखांहून अधिक स्वयं-सहायता गटांमध्ये 10.04 कोटींहून अधिक महिला संघटित : चरणजीत सिंग
Posted On:
12 JUL 2024 1:45PM by PIB Mumbai
दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानामुळे (डीएवाय-एनआरएलएम) 90.76 लाखांहून अधिक स्वयं-सहायता गटांमध्ये 10.04 कोटींहून अधिक महिला एकत्रित आल्याची माहिती ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण उपजीविका विभागाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंग यांनी दिली. नवी दिल्ली येथे काल अब्दुल लतीफ जमील पॉव्हर्टी ॲक्शन लॅब (जे-पीएएल) दक्षिण आशियातर्फे भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या नवीन कल्पना या विषयावर आयोजित गोलमेज परिषदेत ते बोलत होते.
प्रत्येकाला सर्वसमावेशक उपजीविका प्रदान करून हवामान बदल आणि गरिबी या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार काम करत असताना “कोणीही मागे राहू नये”, असे त्यांनी अधोरेखित केले. गरीब महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची नितांत गरज आहे. अनेकदा ही आव्हाने राज्या राज्यानुसार बदलू शकतात. अशी आव्हाने ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक समुदायाविषयी ज्ञान आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. डीएवाय-एनआरएलएम अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नाविन्यपूर्ण भागीदारीबद्दल त्यांनी विचार मांडले. गरिबी संपवण्यासाठी बहु-भागधारक सहकार्यांची गरज आणि महत्त्व यावर त्यांनी भर दिला. "जर आपण एकत्र काम केले तर खूप फरक पडू शकतो," असे त्यांनी सांगितले.
***
S.Kakade/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032743)
Visitor Counter : 59