वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी ई मार्केटप्लेसच्या एकूण व्यापारी मूल्यात 136 टक्के वाढ
Posted On:
11 JUL 2024 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2024
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस सरकारी ई मार्केटप्लेसने(जेम) 1,24,761 लाख कोटींचे सकल व्यापारी मूल्य (जीएमव्ही) गाठले आहे. मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील 52,670 कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ 136 टक्क्यांनी अधिक आहे. मजबूत देशांतर्गत ई-खरेदी बाजारपेठ तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासह 2016 मध्ये हा उपक्रम सुरू झाला. पूर्वीच्या विविध टप्प्यांमध्ये खंडीत प्रणालीला सर्वसमावेशक बनवून एकाच ठिकाणी एकत्र केले आहे. त्यामुळे सर्व सरकारी खरेदीदार मोठ्या प्रमाणावर ही प्रणाली वापरतात.विक्रेते आणि सेवा कंपन्या अखिल भारतीय नेटवर्कद्वारे ही सेवा देतात.
आर्थिक वर्ष 24-25 च्या पहिल्या तिमाहीत सेवा क्षेत्रात 80,500 कोटी रूपयांपेक्षा जास्त स्थूल व्यापारी मूल्य गाठले आहे. आर्थिक वर्ष 23-24 मधील संबंधित कालावधीच्या तुलनेत ही वाढ 330% आहे.
या तिमाहीत कोळसा, संरक्षण आणि पेट्रोलियम आणि वायू मंत्रालये सर्वोच्च खरेदीदार आहेत. या कालावधीत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह केंद्रीय मंत्रालयांनी 1 लाख कोटी रूपयांहून अधिक खरेदी केली. यात केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा 91,000 कोटींहून अधिक आहे.
“आर्थिक वर्ष 23-24 च्या पहिल्या तिमाहीत, केंद्र सरकारच्या कंपन्यांनी 42,500 कोटी रूपये खरेदी केली. या आर्थिक वर्षात त्यांच्या खरेदीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख सहभागी म्हणून, केंद्रीय कंपन्यांनी राष्ट्रीय विकासासाठी संसाधन वाटप करून, सुधारणांना चालना दिली आहे,” असे जेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार सिंग यांनी सांगितले.
प्रत्येक विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक खरेदी आणखी सुलभ करण्याच्या उद्देशाने जेम सहायक कार्यक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे. 6 ते 7000 प्रशिक्षित आणि प्रमाणित मान्यताप्राप्त प्रशिक्षकांचे पॅन इंडिया नेटवर्क तयार करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. संभाव्य आणि विद्यमान जेम विक्रेत्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. विक्रेत्यांवर आकारण्यात येणाऱ्या व्यवहार शुल्कात मोठी कपात हे जेमचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल.
“जीईएमवर लावलेल्या व्यवहार शुल्कात जवळपास 33 ते 96% कपात केल्याने विक्रेत्यांना खूप फायदा होईल आणि त्यांचे प्रस्ताव बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनवण्याची शक्यता आहे,” असे सिंग पुढे म्हणाले.
#Vocalforlocal आउटलेट स्टोअर मार्केटप्लेसचा एक भाग म्हणून "आभार कलेक्शन" नावाचा स्वाक्षरी उपक्रम जेमने सुरू केला. आभार हे 120 हून अधिक उत्कृष्ट आणि हाताने तयार केलेल्या भेटवस्तू आणि हॅम्पर्सचे प्रदर्शन आहे. त्यात एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) आणि भौगोलिक संकेत (जीआय) श्रेणीतील निवडक उत्पादने 500 ते 25,000 रुपयांपर्यंत आहेत. सरकारी खरेदीदार त्यांच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांसाठी त्याचा वापर करतील.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032596)
Visitor Counter : 71