कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीपीजीआरएएमएसद्वारे सोडवण्यात आलेल्या तक्रारी आणि उल्लेखनीय यशोगाथांबाबत पाक्षिक माहिती


जून 2024 च्या पहिल्या 15 दिवसात 69,166 सार्वजनिक तक्रारींचे निवारण

ग्रामीण विकास मंत्रालयाकडून  21,614 तक्रारींचे निवारण, त्यापाठोपाठ श्रम आणि रोजगार मंत्रालय (7324), वित्तीय सेवा विभाग (6206) आणि प्राप्तिकर विभागाकडून (2890) तक्रारींचे निवारण

Posted On: 08 JUL 2024 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्‍ली, 8 जुलै 2024
 
 
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारनिवारण विभागाने जून 2024 च्या पहिल्या 15 दिवसात सोडवलेल्या तक्रारींची यादी प्रसिद्ध केली आहे. याच कालावधीत 69,166 तक्रारींचे निवारण करण्यात आले. दिनांक 1 ते 15 जून, 2024 या कालावधीत तक्रारनिवारणात अग्रेसर राहिलेली भारत सरकारची 5 मंत्रालये/विभाग पुढीलप्रमाणे : 
 

क्र. 

मंत्रालय/विभागाचे नाव 

तक्रारनिवारण संख्या 

1

ग्रामीण विकास विभाग 

21614

2

श्रम आणि रोजगार मंत्रालय 

7324

3

वित्तीय सेवा विभाग  (बँकिंग शाखा  )

6206

4

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ  (प्राप्तिकर )

2890

5

रेल्वे मंत्रालय  ( रेल्वे मंडळ )

2296

    

सीपीजीआरएएमएस पोर्टल वापरूननिवारण करण्यात आलेल्या नागरिकांच्या 5 यशोगाथादेखील प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारनिवारण विभागाने दिल्या आहेत.  या पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता दर आठवड्याला या यशोगाथा प्रकाशित केल्या जाणार आहेत. या यशोगाथांमध्ये निवृत्तिवेतन, दिव्यांग कार्ड, प्राप्तिकर परतावा, इत्यादींचा समावेश आहे. 
 
यशोगाथांची यादी :
  1. राकेश गर्ग यांची तक्रार -व्याजातली सुधारणा आणि परताव्याची रक्कम : राकेश गर्ग यांनी  सीपीजीआरएएमएस पोर्टलवर कलम 234C अंतर्गत व्याजाच्या चुकीच्या गणनेबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीचे निराकरण झाले. परिणामी 3,65,365 रुपयांचा परतावा दिला गेला.  करदात्याद्वारे याचे  सत्यापन होऊन दुजोरा दिला गेला. 
  2. विद्याधर सिंह यांची तक्रार - वन रँक वन पेन्शन-II अंतर्गत 4 हप्ते न मिळणे : नाईक विद्याधर सिंह  यांना वन रँक वन पेन्शन  II अंतर्गत 4 एप्रिल 2024 पर्यंत पात्र असलेले 4 हप्ते मिळाले नव्हते. त्यांनी  सीपीजीआरएएमएस    पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि 49 दिवसांच्या आत  30,806/- रुपये थकबाकी. त्यांच्या  बँक खात्यात जमा झाली.
  3. एसपीआर शोव अहमद यांची तक्रार -रुपये 1,03,412 थकबाकी रक्कम न मिळण्याबाबत : एसपीआर शोव अहमद, एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई असून त्यांची 1,03,412 रुपये थकबाकी असल्याची तक्रार त्यांनी  सीपीजीआरएएमएस नोंदवली. त्यांनी तक्रार दाखल केल्यावर कार्यवाही होऊन त्यांची थकबाकी 8 दिवसांच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. 
  4. लवजीत सिंह  यांची तक्रार - दिव्यांग निवृत्तिवेतनातून चुकीची वसूली : 'SPARSH' निवृत्तिवेतनातून चुकीची वसुली केल्याची तक्रार लवजीत सिंह यांनी सीपीजीआरएएमएस वर दाखल केली. तेव्हा 3 महिन्यांसाठी कापण्यात आलेले त्यांचे 27,411 रुपये परत करण्यात आले आणि खात्यातून होणारी कपात थांबवण्यात आली. 
  5. ओमप्रकाश शर्मा यांची तक्रार -फरकाची रक्कम परत मिळण्याची मागणी : ओमप्रकाश शर्मा यांनी परताव्याच्या रकमेसंदर्भात तक्रार दाखल केली होती. सीपीजीआरएएमएस पोर्टलच्या मदतीने त्यांना वर्ष 2023-24 साठी  31,710 रुपये आणि वर्ष 2012-13 साठी 40,779 रुपये परतावा रक्कम मिळू शकली. 

CPGRAMS STATUS 1.6.2024 TO 15.6.2024

 
नागरिक  www.pgportal.gov.in या सीपीजीआरएएमएस पोर्टलवर लॉगिंग  करून  त्यांची तक्रार नोंदवू शकतात. 
 

 

* * *

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2031508)
Read this release in: Tamil , Urdu , Hindi , Punjabi