दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंचार विभागाने क्वांटम मानकीकरण आणि चाचणी प्रयोगशाळांसाठी प्रस्ताव मागवण्याची केली घोषणा


या प्रयोगशाळा सर्व नागरिकांना लाभ मिळण्याच्या उद्देशाने क्वांटम तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा शोध घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी नवोन्मेष  केंद्र म्हणून काम करतील

क्वांटम संपर्क व्यवस्था घटकांच्या अखंड एकात्मिकतेसाठी आवश्यक मानक  आणि प्रोटोकॉल  स्थापित करण्याचे उद्दिष्ट

क्वांटम संकल्पना, प्रक्रिया, उपकरणे आणि कार्यान्वयन प्रमाणित करण्याच्या उद्देशाने विश्वसनीय चाचणी सुविधा विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा

हा उपक्रम भारताला क्वांटम तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी बनवण्याच्या आणि या अत्याधुनिक क्षेत्रात जागतिक स्तरावर वैश्विक मानक स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

Posted On: 07 JUL 2024 10:34AM by PIB Mumbai

 

दूरसंचार विभागाने "क्वांटम मानकीकरण आणि चाचणी प्रयोगशाळा" या मथळ्याखाली  प्रस्ताव मागवण्याची घोषणा केली आहे आणि भारतीय शैक्षणिक संस्था तसेच  संशोधन आणि विकास संस्थांकडून वैयक्तिकरित्या किंवा भागीदारीत सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले आहे. क्वांटम तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकासाला गती देणे, क्वांटम संपर्क प्रणालीचे आंतर कार्यान्वयन, विश्वासार्हता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रयोगशाळा सर्व नागरिकांच्या फायद्यासाठी क्वांटम तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा शोध आणि वापर करण्यासाठी क्वांटम तंत्रज्ञान विकासक, चाचणी उपकरणे निर्माते आणि शैक्षणिक संशोधकांना एकत्रित करून नवोन्मेष  केंद्र म्हणून काम करतील.

क्वांटम तंत्रज्ञानासह दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणणे

हा उपक्रम पंतप्रधानांच्या जय अनुसंधानया दृष्टीकोनाशी संलग्न आहे, याचा उद्देश दूरसंचार उत्पादने आणि तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकासाला पाठिंबा देणे असून ज्यामुळे भारतीय नागरिकांच्या जीवनमानात थेट सुधारणा घडून येईल. भारताला क्वांटम तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी बनवण्याच्या आणि या अत्याधुनिक क्षेत्रात जागतिक आदर्श स्थापित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा प्रयत्न केवळ सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम क्वांटम संपर्क प्रणालीच्या विकासालाच समर्थन देत नाही तर सर्व भारतीय नागरिकांना प्रगत तंत्रज्ञान प्रदान करणे देखील आहे ज्यामुळे दैनंदिन संप्रेषण, डेटा सुरक्षा आणि एकूणच डिजिटल अनुभव सुधारण्यात लाभदायक ठरेल.

प्रस्तावित प्रयोगशाळांची उद्दिष्टे:

1. क्वांटम प्रमाणीकरण: विद्यमान आणि भविष्यातील दळणवळण नेटवर्कमध्ये  क्वांटम महत्वाच्या बाबींचे वितरण , क्वांटम स्थिती विश्लेषण, ऑप्टिकल फायबर्स आणि घटक यांसारख्या क्वांटम संपर्कव्यवस्था घटकांच्या सहज एकत्रीकरणासाठी आवश्यक मानके आणि प्रोटोकॉल  स्थापित करणे.

2. चाचणी सुविधा: भारतीय उद्योजक, स्टार्टअप, संशोधन आणि विकास तसेच शैक्षणिक संस्थांद्वारे स्थापित  क्वांटम संकल्पना, प्रक्रिया, उपकरणे आणि कार्यान्वयन प्रमाणित करण्यासाठी विश्वसनीय चाचणी सुविधा विकसित करणे. यामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांची कामगिरी सत्यापित करणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांसह  त्यांचे अनुपालन प्रमाणित करणे समाविष्ट आहे. या सुविधा क्वांटम तंत्रज्ञानाच्या विकासास समर्थन देतील ज्याचा वापर नागरिकांना आरोग्यसेवा, शिक्षण आणि आर्थिक यासह विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे करता येईल.

या प्रयोगशाळांचे उद्दिष्ट उद्योग, स्टार्टअप्स आणि स्थानिक दूरसंचार भागधारकांना नाममात्र दरात सुलभरित्या  उपलब्ध करून देणे, प्रगत क्वांटम तंत्रज्ञानाचे फायदे सर्वांसाठी उपलब्ध आहेत हे सुनिश्चित करणे हा आहे. सर्वसमावेशक दृष्टीकोन वाढवून, हा उपक्रम स्वदेशी क्वांटम तंत्रज्ञान पर्यायांच्या वाढीला समर्थन देतो, ज्यामुळे जागतिक मानकांमध्ये भारताला अग्रस्थान प्राप्त होते. 

चाचणीसाठी प्रस्तावित तंत्रज्ञान:

एकल फोटॉन आणि गुंतागुंतीचे फोटॉन स्रोत.

एकल फोटॉन शोधक, अत्युच्च वाहक नॅनोवायर एसपीडी आणि हिमस्खलन फोटोडायोड्स.

क्वांटम साठवण आणि पुनरावृत्ती.

• QKD च्या धर्तीवर क्वांटम संपर्क प्रणाली, क्वांटम दूरसंचार वहन आणि अवकाशमुक्त  क्वांटम संपर्क व्यवस्था .

विश्वसनीय तसेच अविश्वसनीय शाखा

 आणि

क्वांटम संपर्कव्यवस्था विषयाशी संबंधित अन्य कोणत्याही बाबी.

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. सादरीकरण मार्गदर्शक तत्त्वे आणि पात्रतांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया दूरसंचार विभागाचे संकेतस्थळ https://dot.gov.in  यावर भेट द्या किंवा https://ttdf.usof.gov.in  येथे TTDF अर्थात दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी कार्यक्रम कार्यालयाशी संपर्क साधावा.

***

S.Kane/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031410) Visitor Counter : 16


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil