वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ड्रोन संबंधित व्यवस्थांचा विकास कृषी क्षेत्रातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी असलेल्या पंतप्रधानांच्या ‘नमो ड्रोन दिदी’ योजनेला अनुरूप

Posted On: 04 JUL 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ‘पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (पीएचडीसीसीआय) ने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नवोन्मष बैठकीला आज संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ड्रोन उद्योगाला पुढे आणण्यासाठी सज्ज असून गेल्या तीन वर्षात या उद्योगाची वेगाने वाढ झाली आहे. नवोन्मेषाच्या बळावर होत असलेल्या ड्रोन संबंधित तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या वाढीची  प्रशंसा करत गोयल यांनी सांगितले की ड्रोन संबंधित व्यवस्थांचा विकास व त्यांच्या वापराला देशभरातील गावांमध्ये मिळत असलेली चालना ही पंतप्रधानांच्या ‘नमो ड्रोन दिदी’ उपक्रमांतर्गत कृषी क्षेत्रातील महिलांच्या सशक्तीकरणास मदत करेल.

ड्रोन उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती अनिश्चित हवामानाचा अंदाज बांधण्यास सहाय्यभूत ठरेल व त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जा आणि अधिक प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी आखणी करता येईल. ड्रोन आणि ड्रोनच्या भागांसाठी उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजना या क्षेत्राच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आहे. मात्र, तिला कायमस्वरुपी सरकारी अनुदान योजना म्हणून गृहीत धऱून नये, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

ड्रोनशी संबंधित उद्योगांना आर्थिक पाठबळ आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी ‘सीडबी’ (एसआयडीबीआय) ला या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरता जोडून घेता येऊ शकते, असेही ते म्हणाले.

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2030863) Visitor Counter : 70


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil