नौवहन मंत्रालय
मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या वतीने येत्या शुक्रवारी ‘पोर्ट ऑफ द फ्युचर’ या विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
03 JUL 2024 5:45PM by PIB Mumbai
गोवा, 3 जुलै 2024
केंद्र सरकारच्या बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत, मुरगाव बंदर प्राधिकरण आणि दीपगृहे महासंचालनालय, यांच्या वतीने दिनांक 5 जुलै 2024 रोजी इंटरनॅशनल सेंटर गोवा, डोना पॉला, उत्तर गोवा येथे “भविष्यातील बंदर” या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.प्रमुख बंदरांचे 'पोर्ट 4.0' मध्ये रूपांतर करणे, प्रमुख व्यवसाय प्रक्रिया डिजिटल माध्यमाद्वारे परीवर्तित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, सुरक्षा व्यवस्था सुधारणे,कार्यक्षमतेचा विकास साधणे, बंदराची स्थिरता वाढवणे आणि प्रमुख बंदरांमध्ये डेटा ट्रान्समिशन वेळेत सुरळीत नेव्हिगेशनसह सक्षम करणे -हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
भारतीय बंदरांसाठी 5G तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीकडे वाटचाल करण्यासाठी आणि प्रगत व्हेसल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आणि वेसेल ट्रॅफिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नौवहन, सुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारणे हा या परिषदेचा उद्देश आहे.
या परिषदेत जागतिक बंदरांमध्ये लागू करण्यात आलेल्या 5G कम्युनिकेशन नेटवर्क आणि एआय, ब्लॉक चेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या बंदरांची मुख्य स्पर्धात्मकता सुधारण्याच्या माध्यमांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल चर्चा केली जाईल.
हा कार्यक्रम, 5G तंत्रज्ञान आणि जहाजे वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या अत्याधुनिक प्रगती आणि अनुप्रयोगांवर चर्चा करण्यासाठी तसेच सागरी कार्यवाहीसाठी उद्योगधुरीण, संशोधक, व्यावसायिक, बंदर प्रशासक आणि अधिकारी आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातील धोरणकर्त्यांना एकत्र आणेल .
* * *
PIB Panaji | S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2030462)
आगंतुक पटल : 86