नौवहन मंत्रालय

सर्वानंद सोनोवाल यांनी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग क्षेत्रातील हितधारकांसोबत साधला अर्थसंकल्पपूर्व संवाद

Posted On: 01 JUL 2024 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2024

 

आगामी अर्थसंकल्पाच्या तयारीचा एक भाग म्हणून केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्लीत विविध हितधारकांसोबत अर्थसंकल्पपूर्व फलदायी बैठक घेतली. विविध क्षेत्रातील तज्ञ आणि हितधारकांसोबत खुली चर्चा करण्याच्या आणि त्यांच्याकडून बहुमूल्य अभिप्राय प्राप्त करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीदरम्यान सर्वानंद सोनोवाल यांनी हितधारकांना राष्ट्र उभारणीकरता त्यांच्या सूचना आणि कल्पना सामाईक करण्यासाठी प्रोत्साहन देत सहकार्यात्मक  वातावरण निर्माण करण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.

आमच्या हितधारकांचा उत्साही सहभाग आणि बहुमूल्य योगदान खरोखरच प्रशंसनीय आहे. या संवादामुळे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाला अंतर्दृष्टीपूर्ण दृष्टीकोन प्राप्त झाला आहे जो निःसंशय पंतप्रधानांच्या एमआयव्ही 2030 आणि अमृत काळ व्हिजन 2047 च्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाशी सुसंगत अधिक समावेशक आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पाला आकार देण्यात मदत करेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

आर्थिक वृद्धी आणि पर्यावरणीय शाश्वतीला पाठबळ देणारी एक भक्कम सागरी परिसंस्था उभारण्यावर सरकारचा भर आहे. वाढवण मेगा ट्रान्सशिपमेंट पोर्ट आणि क्रूझ इंडिया मिशन यांसारख्या प्रकल्पांद्वारे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय भारताला जागतिक सागरी केंद्र बनवण्यासाठी सज्ज आहे, असे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.

विकासाच्या संधींचा शोध घेणे, आव्हानांना तोंड देणे आणि देशाची प्रगती करण्यासाठी नवोन्मेषी उपायांची चाचपणी करणे यावर ही चर्चा केंद्रित होती.

विविध गटांसोबत संवाद साधण्याची आणि त्यांचे आवाज ऐकले जातील हे सुनिश्चित करण्याची सरकारची वचनबद्धता हितधारकांसोबतच्या या अर्थसंकल्पपूर्व बैठकीतून अधोरेखित होत आहे. आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना यातून प्राप्त झालेले अभिप्राय आणि सूचना आगामी अर्थसंकल्पाला आकार देण्यात आणि साहजिकच त्यामुळे देशाची प्रगती आणि समृद्धीत योगदान देण्यात अतिशय महत्त्वाचे ठरतील.  

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030104) Visitor Counter : 51