युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय पथकाला दिली प्रेरणा


त्यांनी औपचारिक निरोप समारंभात भाग घेतला आणि भारतीय संघाच्या क्रीडासाहित्य किट्सचे अनावरण केले

Posted On: 30 JUN 2024 8:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) आयोजित केलेल्या क्रीडापटूसाठीच्या निरोप समारंभात भाग घेतला. त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह  पुरी आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ. पी.टी. उषा उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भारतीय संघाच्या तीन किटचे अनावरण करण्यात आले (सेरेमोनिअल ड्रेस, प्लेइंग किट आणि परफॉर्मन्स शू आणि ट्रॅव्हल गियर). पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आयोजित केलेल्या औपचारिक निरोपाच्या वेळी त्यांच्या पुढच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.

या मेळाव्याला संबोधित करताना डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, सर्व भारतीयांनी कठोर परिश्रम, समर्पण आणि देशाच्या क्रीडापटूंच्या अविचल भावनेचा उत्सव साजरा केला आहेसर्वात मोठ्या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान या क्रीडापटूंनी मिळवला आहे. "

 

डॉ. मांडविया म्हणाले की, भारताला क्रीडाशक्ती बनवण्याच्या चळवळीत सरकार आघाडीवर आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकारने लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजना (टीओपीएस) सारख्या विविध योजनांद्वारे खेळाडूंना पाठबळ दिले आहे. जे अशा सर्वोच्च क्रीडा प्रकारात सहभागी होणाऱ्यांना  विशेष पाठबळ प्रदान करते." असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की सरकार खेळाडूंना त्यांची जागतिक क्रमवारी उच्च ठेवण्यासाठी, त्यांना भारतातील आणि परदेशातील विविध ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवण्यासाठी, प्रख्यात परदेशी तज्ञांना प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी म्हणून सहभागी करून घेण्यासाठी आणि क्रीडा परिसंस्थेला गती देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. त्यामुळे जगभरातील क्रीडा क्षेत्रातील उत्क्रांतीमध्ये भारतीय खेळाडूंना सहभागी होता येईल."

हरदीप सिंह  पुरी म्हणाले की, त्यांच्या मंत्रालयाने भारताच्या ऑलिम्पिक खेळातील सहभागाला मदत करणे ही अभिमानाची बाब आहे. "

किट्स बद्दल:

तीन किटमध्ये जेएसडब्ल्यू इन्स्पायरने डिजाइन केलेले प्लेइंग किट, तरुण ताहिलियानीच्या मालकीच्या  टीएएसव्हीए द्वारे डिझाइन केलेले सेरेमोनिअल ड्रेस आणि प्युमाचे परफॉर्मन्स शू आणि ट्रॅव्हल गियर खेळाडूंनी आत्मविश्वास पूर्ण केलेल्या रॅम्प वॉक मध्ये बघायला मिळाले.

टीम इंडियाच्या क्रीडा साहित्य  किटची रचना आपल्या बलाढ्य राष्ट्राच्या विविध प्रदेशांचा आत्मविश्वास, अष्टपैलुत्व दर्शवते.

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029806) Visitor Counter : 101