सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नाडियाद येथील खेडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या  76 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दूरदृश्य प्रणालीमार्फत केले संबोधित तसेच बँकेच्या नवीन इमारतीचे केले उद्घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला "सहकार से समृद्धी और समृद्धी से संपूर्णता" हे सूत्र दिले: अमित शहा

भारत सरकारने पॅक्स च्या बळकटीकरणासाठी 20 विविध उपक्रम हाती घेतले आहेत, जिल्हा सहकारी बँकांनी देखील पॅक्स मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे : अमित शहा

Posted On: 30 JUN 2024 4:17PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधील नाडियाद येथील खेडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड च्या 76 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केले. यावेळी त्यांनी 18 कोटी 70 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बँकेच्या नवीन इमारतीचे (सरदार पटेल सहकार भवन) उद्घाटनही केले. 

Picture 1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेला सहकार से समृद्धी और समृद्धी से संपूर्णताहे सूत्र मिळाले आहे, असे शहा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. याच संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना केली, असेही ते म्हणाले. आगामी काळात सहकार क्षेत्राला किमान 100 वर्षांचे आयुष्य देण्यात हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले.

Picture 2

केंद्र सरकार सहकारी संस्थांमध्ये सहकार्यया नवीन उपक्रमांतर्गत बनासकांठा आणि पंचमहाल जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवत आहे, असे त्यांनी सांगितले. सहकारी संस्थांमध्ये सहकार्यहा मंत्र साकार  झाला तर भारताला सहकार क्षेत्रात  कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत केंद्र किंवा राज्य सरकारकडून एक रुपयाही घेण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण सहकार चळवळ केवळ सहकारी संस्थांच्या पैशानेच जोमात चालू शकेल हे शहा यांनी स्पष्ट केले.

Picture 1

जिल्हा सहकारी बँकांनीही प्राथमिक कृषी पतसंस्था मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे अमित शहा म्हणाले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029756) Visitor Counter : 85