अंतराळ विभाग

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ग्रामीण भू-अभिलेखासाठी ‘भुवन पंचायत (आवृत्ती. 4.0)’ पोर्टल आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) विकसित केलेल्या ‘आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेटाबेस (एनडीइएम आवृत्ती. 5.0)’ या दोन जिओपोर्टलचे अनावरण

Posted On: 28 JUN 2024 7:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज पृथ्वी भवन येथे ग्रामीण भू-अभिलेखासाठी 'भुवन पंचायत (आवृत्ती. 4.0)' पोर्टल आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) विकसित केलेल्या "आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेटाबेस (एनडीइएम आवृत्ती. 5.0)" या दोन जिओपोर्टलचे अनावरण केले.

ही अद्ययावत भू-स्थानिक साधने संपूर्ण देशभरातील विविध स्थानांसाठी 1:10K स्केलची उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा प्रदान करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन आणि नियोजनासाठी आहेत.

आम्ही केवळ रॉकेट प्रक्षेपित करून अंतराळात पोहोचलो नाही तर आम्ही आकाशातून पृथ्वीचे मॅपिंग देखील करत आहोतअसे जिओपोर्टल्सचे अनावरण केल्यावर इस्रो चमूचे अभिनंदन करताना मंत्र्यांनी नमूद केले. अंतराळ-तंत्रज्ञानाने अक्षरशः प्रत्येक घरात प्रवेश केला आहे. अंतराळातील विकासाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर बहुआयामी प्रभाव पडेल मग ते टेलिमेडिसिन असो, डिजिटल इंडिया असो, मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ओळखणे असो असा विश्वास असणाऱ्या अंतराळ तंत्रज्ञानाचे जनक विक्रम साराभाई यांचा दृष्टिकोन आपण योग्यरीत्या पुढे नेत आहोत असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी निदर्शनास आणले.

"विकेंद्रित नियोजनासाठी अवकाश आधारित माहिती समर्थन (SISDP)" चे समर्थन करण्यासाठी आणि पंचायतींमधील तळागाळातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी 'भुवन पंचायत पोर्टल'चे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री म्हणाले की जमिनीच्या नोंदींसाठी स्थानिक प्रशासनावर अवलंबून राहण्याची गरज कमी करून आणि डिजिटलायझेशन आणि जमीन महसूल व्यवस्थापनाद्वारे भूमी अभिलेख व्यवस्थापनात क्रांती घडवून आणून त्यांना या सेवांचा लाभ घेण्याची परवानगी देण्यासाठी तळागाळातील नागरिकांना सक्षम करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही साधने नागरिकांकडून प्राप्त माहितीनुसार अद्ययावत डेटा प्रदान करतील आणि तळागाळातील भ्रष्टाचार कमी करतील.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि नेतृत्वासाठी इस्रो चे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव एस. सोमनाथ यांनी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज; भू विज्ञान विभागाचे सचिव रवी चंद्रन; गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव एस.के. जिंदाल; राजेश एस. वन महानिरीक्षक, Moefcc; मनीष के, उप. महासंचालक, जीएसआय खाण मंत्रालय आणि एनआरएससी चे संचालक डॉ. प्रकाश चौहान, हे देखील यावेळी उपस्थित होते.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029418) Visitor Counter : 23


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu