अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मे 2024 (आर्थिक वर्ष 2024-25) पर्यंतच्या केंद्र सरकारच्या लेख्याचा मासिक आढावा

Posted On: 28 JUN 2024 5:17PM by PIB Mumbai

 

मे 2024 पर्यंतच्या केंद्र सरकारच्या मासिक लेख्याचे संकलन करून अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:-

भारत सरकारला मे 2024 पर्यंत 5,72,845 कोटी रुपये (एकूण प्राप्तीच्या 2024-25 च्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 18.6%) प्राप्त झाले आहेत ज्यात कर महसूलापोटी 3,19,036 कोटी रुपये (केंद्राकडे निव्वळ), कराव्यतिरिक्त महसुलापोटी 2,51,722 कोटी रुपये तर कर्जाव्यतिरिक्तच्या भांडवली मिळकतीपैकी कर्जाच्या वसुलीतून 2,087 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारने करातील वाट्याचे हस्तांतरण म्हणून राज्य सरकारांना या कालावधीपर्यंत 1,39,751 कोटी रुपये दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीची ही रक्कम 21,471 कोटी रुपयांनी जास्त आहे.

केंद्र सरकारचा एकूण व्यय 6,23,460 कोटी रुपये (2024-25 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 13.1%) आहे, ज्यापैकी महसूल खात्यातून झालेला खर्च 4,79,835 कोटी रुपये आणि भांडवली खात्यातून झालेला खर्च 1,43,625 कोटी रुपये आहे. एकूण महसुली खर्चापैकी, व्याज चुकते करण्यासाठी 1,23,810 कोटी रुपये तर प्रमुख अनुदानाच्या माध्यमातून 54,688 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029384)