संरक्षण मंत्रालय
'प्रथम वापर नाही आणि चोख प्रत्युत्तर', या तत्त्वावर भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे वेगळेपण आधारित आहे: सीडीएस जनरल अनिल चौहान
Posted On:
26 JUN 2024 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2024
संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी, भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे वेगळेपण 'प्रथम वापर नाही आणि चोख प्रत्युत्तर', या तत्त्वावर आधारित असल्याचा पुनरुच्चार केला आहे. जनरल अनिल चौहान 26 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे, सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज – IISS (CAPS – IISS) द्वारे, 'आण्विक धोरण: समकालीन विकास आणि भविष्यातील शक्यता', या विषयावर आयोजित परिषदेत बोलत होते. जनरल अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात पारंपरिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकला. अण्वस्त्रांचा धोका भू-राजकीय परिप्रेक्षात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचे त्यांनी नमूद केले.
संरक्षण दल प्रमुखांनी सखोल विचार, नवीन सिद्धांतांचा विकास, प्रतिकार क्षमतेचा पुनर्विचार आणि आण्विक (सी4आय2एसR अर्थात ताबा घेणे, नियंत्रण करणे, परस्पर संवाद, कॉम्प्युटर, गुप्तचर यंत्रणा, माहिती, पाळत ठेवणे आणि शोध) पायाभूत सुविधांचे रक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला.
जनरल अनिल चौहान यांनी CAPS – IISS परिषदेत, एशियन डिफेन्स रिव्ह्यू 2024, ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजीज एंड चेंजिंग डायमेंशन्स ऑफ थ्रेट्स टू इंडिया’ या आवृत्तीचे प्रकाशन देखील केले.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028905)
Visitor Counter : 88