माहिती आणि प्रसारण मंत्रालय

औरंगाबाद येथील भारतीय पर्यटन विभाग आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग   यांनी प्रसिद्ध बीबी का मकबरा इथे संयुक्तपणे साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

Posted On: 22 JUN 2024 10:42AM by PIB Mumbai

 

भारतीय पर्यटन विभाग आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांनी संयुक्तपणे काल दि. 21 जून 2024 रोजी औरंगाबाद इथल्या बीबी का मकबरा इथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना योगाभ्यास आणि ध्यान धारणा तसेच त्यांचे दैनंदिन जगण्यातील महत्त्व या विषयी माहिती दिली गेली. त्यानंतर उपस्थितांना नियमितपणे करता येण्या सारख्या  योगासनांचे प्रात्यक्षिक दिले गेले. यासाठी औरंगाबाद येथील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमधील अनुभवी योग प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

बीबी का मकबरासारख्या  वास्तुची पार्श्वभूमी आणि आसपासच्या शांततामय वातावरण यामुळे योगाभ्यासाच्या सरावाचे ठिकाण म्हणून ही अत्यंत योग्य निवड ठरली.

भारतीय पर्यटन विभागाच्या औरंगाबाद इथल्या कर्मचाऱ्यांसह 130 पेक्षा जास्त नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण  विभागाचे कर्मचारीकेंद्रीय विद्यालयातील युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी, महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी शाळा, महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था, अभियांत्रिकी  महाविद्यालय कॉलेज, प्रादेशिक स्तरावरील पर्यटन मार्गदर्शक, तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेकांसह  पर्यटकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

***

NM/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027890) Visitor Counter : 38