संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन : भारतीय तटरक्षक दलाने संपूर्ण देशभरात 60 ठिकाणी केले योगसत्रांचे आयोजन; भारतीय तटरक्षक दलाच्या महासंचालकांनी 1,000 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत नवी दिल्ली येथे केली योगासने

Posted On: 21 JUN 2024 3:44PM by PIB Mumbai

 

भारतीय तटरक्षक दलाने 21 जून 2024 हा दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन संस्मरणीय करण्यासाठी  संपूर्ण देशभरात 60 हून अधिक ठिकाणी समन्वित योगसत्रांचे आयोजन केले. मुख्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नेतृत्व  भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी केले तर दलाचे  कर्मचारी आणि कुटुंबिय अशा 1,000 जणांनी यावेळी योगासने केली. योगाभ्यासाला आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणे गरजेचे असून  विशेषतः अतिशय महत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या तटरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना तर ते  अत्यंत आवश्यक आहे, असे महासंचालकांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

या कार्यक्रमात प्रशिक्षित योग शिक्षकांनी उपस्थितांना आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणा इत्यादींबाबत सूचना दिल्या. प्रख्यात योग प्रशिक्षक नेहा मेहतानी आणि त्यांच्या नऊ सदस्यांच्या टीमने सहभागींना  योगाभ्यासाबाबत मोलाची माहिती आणि तंत्रे सांगितली.

तटरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन आणि एकूण लवचिकता वाढवण्यासाठी आवश्यक अशा आसनांवर विशेष ध्यान केंद्रित करण्यात आले. योगाभ्यास नव्याने शिकणाऱ्यांपासून ते अनुभवी योग अभ्यासकांपर्यंत सर्वांना या सत्रात सहभागी होता येईल, अशा पद्धतीने सत्रांची रचना करण्यात आली होती.

***

S.Kakade/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2027580) अभ्यागत कक्ष : 101