संरक्षण मंत्रालय
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेच्या देशभरातील आठ लाख कॅडेट्सनी केली योगासने
Posted On:
21 JUN 2024 12:43PM by PIB Mumbai
देशभरात 21 जून 2024 रोजी आयोजित योग सत्रांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या आठ लाख कॅडेट्सनी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. हा कार्यक्रम अनेक शाळा, महाविद्यालये आणि सूर्य मंदिर (कोणार्क, ओडिशा), लाल किल्ला (दिल्ली), दल तलाव (श्रीनगर, जम्मू-काश्मीर), साबरमती रिव्हरफ्रंट (अहमदाबाद, गुजरात), सांची स्तूप (सांची, मध्य प्रदेश), गेटवे ऑफ इंडिया (मुंबई, महाराष्ट्र), नैनिताल तलाव ( नैनिताल, उत्तराखंड), झाशी किल्ला (झाशी, उत्तर प्रदेश), आणि व्हिक्टोरिया मेमोरियल (कोलकाता, पश्चिम बंगाल) अशा ऐतिहासिक स्थळी आयोजित करण्यात आला होता.
दिल्ली क्षेत्रातील भारतीय लष्कर मुख्यालयाने दिल्ली कँटमधील करिअप्पा परेड मैदान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सध्या लष्कराचे उपप्रमुख असलेले आणि पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्त लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी या सोहळ्याचे नेतृत्व केले. त्यांनी एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग, इतर वरिष्ठ अधिकारी आणि सुमारे 250 छात्रसैनिकांसह योगासने केली.
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी उपस्थित कॅडेट्सना योगाभ्यासाचे लाभ सांगितले आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपल्या दिनचर्येत त्याचा समावेश करण्याचे आवाहन केले. "आपले संपूर्ण आरोग्य आणि निरामय जीवनासाठी योगाभ्यास हे एक अतिशय सामर्थ्यशाली साधन आहे. योगाभ्यास शरीर आणि मनाचे संतुलन राखतो, तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे." असे त्यांनी सांगितले.
HOO0.jpg)
TVZO.jpg)
AMKN.jpg)
***
S.Kakade/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2027520)