भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने हरयाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीरसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण केले सुरू
Posted On:
21 JUN 2024 12:31PM by PIB Mumbai
18व्या लोकसभा निवडणुकांच्या यशस्वी पूर्ततेनंतर निवडणूक आयोगाने आता हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीकरता मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू केले असून यासाठी 1 जुलै 2024 पात्रता तारीख म्हणून निश्चित केली आहे. तीन राज्यांतील विद्यमान विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे 03.11.2024, 26.11.2024 आणि 05.01.2025 रोजी संपत आहे आणि या विधानसभांच्या निवडणुका त्यांच्या मुदती पूर्ण होण्यापूर्वी आयोजित करणे आवश्यक आहे.
याशिवाय, मतदारसंघांच्या सीमांकनानंतर नवीन सदन स्थापन करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील घेतल्या जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांचा मोठा सहभाग पाहता, निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 पात्रता तारीख धरून जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे निर्देशही दिले आहेत.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पात्रता तारीख 1 जानेवारी 2024 धरून मतदार याद्यांचे शेवटचे विशेष सारांश पुनरिक्षण करण्यात आले. निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021 द्वारे लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 14 मध्ये सुधारणा केल्यानंतर आता एका वर्षात चार पात्रता तारखांची तरतूद उपलब्ध आहे. त्यानुसार, सर्व पात्र आणि नावनोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची पुरेशी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि त्याद्वारे आगामी निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळावी यासाठी आयोगाने हरयाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात 01.07.2024 पात्रता तारीख निश्चित करून मतदार याद्यांची दुसरी विशेष सारांश पुनरावृत्ती (एसएसआर) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अचूक , सर्वसामावेशक आणि अद्ययावत मतदार याद्या हा मुक्त, निर्भय आणि विश्वासार्ह निवडणुकांचा पाया आहे, यावर निवडणूक आयोगाची ठाम निष्ठा आहे. मतदार यादीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, आयोग प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यापूर्वी सखोल पुर्नरिक्षण -पूर्व उपक्रम राबवण्यावर विशेष भर देत आहे.
पुर्नरिक्षण -पूर्व उपक्रमांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
A. मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांद्वारे घरोघरी सर्वेक्षण: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी खालील माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी भेट देतील:
• नाव नोंदणी नसलेले पात्र नागरिक (01.07.2024 रोजी पात्र)
• अनेक नोंदी/मृत मतदार/कायमचे स्थलांतरित मतदार
• मतदार याद्यांच्या नोंदींमध्ये सुधारणा
B. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण किंवा पुनर्रचना:
मतदारांच्या सुविधेसाठी अगदी लहान वस्तीच्या जवळ मतदान केंद्रे उभारण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यात बाधा ठरणाऱ्या भीती, मौन किंवा इतर घटकांची शक्यता निष्क्रिय करण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच हेतूने, लोकसभा निवडणुक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2023 रोजीच्या निर्देशांद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना उंच इमारतीत राहणाऱ्या मतदारांसाठी किंवा समूह गृहनिर्माण सोसायट्या मध्ये राहणाऱ्या मतदारांना सर्वात सोयीस्कर ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्याचे निर्देश दिले होते. त्या सोबतच शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे मतदार तसेच शहरी,निमशहरी आणि ग्रामीण विभागाच्या विस्तारित क्षेत्रात राहणाऱ्या मतदारांसाठी देखील सर्वात सोयीस्कर ठिकाणी मतदान केंद्र उभारण्याचे निर्देश दिले होते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान, अशा मतदान केंद्रांवर रहिवासी सोसायट्यांव्यतिरिक्त उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे अनुभवाला आले आहे. त्यामुळे आयोगाने पुन्हा एकदा सीईओंना निर्देश दिले. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणादरम्यान व्यापक सर्वेक्षण केले पाहिजे आणि त्या उद्देशासाठी पुरेशा खोल्या/सामान्य सुविधा क्षेत्र/सामुदायिक हॉल/शाळा असलेल्या समूह गृहनिर्माण सोसायट्या आणि उच्चभ्रू निवासी इमारती रहिवासी मतदारांसाठी योग्य प्रक्रियेचे पालन करून मतदान केंद्र उभारण्यासाठी निवडल्या जातील.
त्यामुळे, आयोगाने पुन्हा एकदा या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या सुरू असलेल्या मोहीमेत व्यापक सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्वेक्षणात योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर, रहिवासी मतदारांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशाने शहरी भागातील पुरेशा खोल्या किंवा सामाईक सुविधा क्षेत्र किंवा सामुदायिक सभागृहे किंवा शाळा असलेल्या समूह गृहनिर्माण सोसायट्या आणि उच्चभ्रू निवासी इमारती निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
C. जेथे आवश्यक असेल तेथे अस्पष्ट, निकृष्ट दर्जाची, योग्य तपशील न दर्शवणारी आणि मानवी प्रतिमांचा समावेश नसलेली छायाचित्रे बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे सुनिश्चित करणे.
The schedule for the SSR would be as follows:
S. No.
|
Activity
|
Period
|
Pre-revision activities
|
1.
|
- H2H verification through BLOs
- Rationalization/Re-arrangement of Polling Stations
|
25.06.2024 (Tuesday) to
24.07.2024 (Wednesday
|
|
- Removal of discrepancies in the Electoral roll/EPIC
- Improvement of image quality ensuring good quality photographs, by replacing blurred, poor quality and not to specification and non-human images in the roll, wherever necessary
- Recasting of Section/Parts and Finalization of proposed restructuring of section/part boundaries location of polling stations and getting approval of list of polling stations
- Updation of Control table
- Preparation of Format 1 to 8
- Preparation of integrated draft roll with reference to 01.07.2024 as the qualifying date
|
|
Revision Activities
|
2.
|
Publication of Integrated draft electoral roll.
|
On 25.07.2024 (Thursday)
|
3.
|
Period for filing claims & objections
|
25.07.2024 (Thursday) to
09.08.2024 (Friday)
|
4.
|
Special campaign dates
|
Saturdays and Sundays within claims and objection period
(to be fixed by the CEO)
|
5.
|
(i.) Disposal of claims and objections
(ii.) Checking of health parameters and obtaining Commission’s permission for final publication
(iii.) Updating database and printing of supplements
|
By 19.08.2024 (Monday)
|
6.
|
Final publication of electoral roll
|
On 20.08.2024 (Tuesday)
|
मतदार यादीची सर्वसमावेशकता, अचूकता आणि दर्जा सुनिश्चित करण्यावर निवडणुक आयोगाचे कायमच सखोल लक्ष केंद्रीत राहिले आहे. जेणेकरून कोणताही पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट होण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही तसेच शक्य तितक्या प्रमाणात कोणत्याही नकली आणि अपात्र नोंदीशिवाय मतदार यादी कायम त्रुटीमुक्त राहील. त्यामुळे, जर आतापर्यंत नावनोंदणी केली नसेल तर आगामी निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे
***
S.Kane/B.Sontakke/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027438)
Visitor Counter : 154