संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर प्रदेशात मथुरा येथे 1 कोर मधील सैनिकांसोबत योगासने केली आणि 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सशस्त्र दलांचे नेतृत्व केले

Posted On: 21 JUN 2024 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2024

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 21 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा येथील 1कोर मधील सैनिकांसोबत  विविध आसने आणि श्वसनाचे व्यायाम करून 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात  सशस्त्र दलांचे नेतृत्व केले. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि जनरल ऑफिसर कमांडिंग, 1 कोर चे लेफ्टनंट जनरल संजय मित्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अग्निवीर, कुटुंबिय आणि मुलांसह 600 लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावर्षीच्या "योग स्वतःसाठी आणि समाजासाठी" या योगदिनाच्या संकल्पनेविषयी बोलताना राजनाथ सिंह  म्हणाले की योग आणि ध्यानधारणा हा आपल्या संस्कृतीचा भाग असून त्यामुळे माणूस स्वतःशी, कुटुंबाशी आणि समाजाशी जोडला जातो. "योग आणि ध्यान हे आपल्या 'सर्वे भवनतु सुखिनः, सर्वे संतु निरामया’ अर्थात  सर्वांच्या आनंदासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याच्या संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. आपण जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करूया. हेच आपल्या सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले.

"प्रत्येक भारतीय सैनिक हा एक प्रकारे एक योगी आहे. केवळ सीमेच्या रक्षणातच नव्हे तर देशावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांच्या सेवेतून एका भक्कम शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचे उदाहरण दिसून येते, असे संरक्षणमंत्री म्हणाले. ज्या प्रकारे ते प्रतिकूल परिस्थितीत अनावश्यक आक्रमकता टाळतात आणि देशाची एकता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कायम सज्ज राहतात, जिथे गरज असेल तिथे तत्परतेने धावून जातात त्यातून त्यांची योगी ही ओळख दिसून येते,” असे राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी सैनिकांना दररोज योगसाधना  करत राहण्याचे आवाहन केले.

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी तामिळनाडूच्या रामेश्वरम बेटाचे दक्षिणेकडील टोक असलेल्या धनुषकोडी येथे भारतीय तटरक्षक दलाने आयोजित केलेल्या विशेष योग सत्रात भाग घेतला. 

 

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027368) Visitor Counter : 23