केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोक सेवा आयोगाने जाहीर केले संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II),2023 चे अंतिम निकाल

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2024 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024


केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेली संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू होणाऱ्या (i) *अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई, 120वा लघु सेवा आयोग अभ्यासक्रम (बिगर तांत्रिक, पुरुषांसाठी) आणि (ii) ^अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई, 34वा लघु सेवा आयोग महिला (बिगर तांत्रिक) अभ्यासक्रम यांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या मुलाखतींच्या निकालावर आधारित उत्तीर्ण झालेल्या 271 (*204 + ^67 ) उमेदवारांच्या गुणवत्ता याद्या पुढील प्रमाणे आहेत:

1. 120व्या लघु सेवा आयोग अभ्यासक्रमाच्या (एनटी, पुरुषांसाठी)च्या यादीमध्ये भारतीय लष्कर अकादमी, डेहराडून; भारतीय नौदल अकादमी, एळिमला, केरळ आणि वायू दल अकादमी, हैदराबाद (उड्डाणपूर्व) प्रशिक्षण अभ्यासक्रम या प्रवेशासाठी समान परीक्षेच्या निकालाच्या आधारे यापूर्वी शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे देखील समाविष्ट आहेत.

2. (I) केंद्र सरकारने सूचित केल्यानुसार 120 व्या लघु सेवा आयोग अभ्यासक्रमासाठी (पुरुषांसाठी) 169 आणि (II) 34 व्या लघु सेवा आयोग महिला (बिगर तांत्रिक) अभ्यासक्रमासाठी रिक्त पदांची संख्या 16 आहे.

3. या याद्या तयार करताना आरोग्य तपासणीचे निकाल लक्षात घेतलेले नाहीत. उमेदवारांची गुणांनुसार केलेली निवड सध्या तात्पुरती आहे. या उमेदवारांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रता यांची पडताळणी लष्कराच्या मुख्यालयाकडून केली जाईल.

4. हे निकाल केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. मात्र, उमेदवारांचे गुण अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आयोगाच्या संकेतस्थळावर 30 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध होतील.

5. आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या गुणांचे सार्वजनिक प्रकटीकरण आणि शिफारस नसलेल्या उमेदवारांचे इतर तपशील प्रकट न करणे या योजनेकडेही उमेदवारांचे लक्ष वेधण्यात आले आहे. असे शिफारस न केलेले उमेदवार त्यांचे गुण डाउनलोड करताना उपलब्ध पर्याय वापरू शकतात.

6. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोक सेवा आयोग कार्यालयाच्या परिसरात परीक्षा हॉल इमारतीजवळ एक सुविधा केंद्र आहे. उमेदवार या केंद्राला कामकाजाच्या कोणत्याही दिवशी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 यावेळेत प्रत्यक्ष भेट देऊ शकतात किंवा 011-23385271, 011-23381125 and 011-23098543 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.
 
इंग्रजी निकाल PDF मध्ये पहा

हिंदी निकाल PDF मध्ये पहा

S.Pophale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2027195) आगंतुक पटल : 108
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Telugu