दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने राष्ट्रीय प्रसारण धोरण-2024 बाबतच्या सूचनांवरील शिफारशी केल्या जारी
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2024 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2024
ट्राय (TRAI), अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज ‘राष्ट्रीय प्रसारण धोरण-2024 बाबतच्या सूचनांवरील शिफारशी जारी केल्या.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, 13 जुलै 2023 रोजी पत्राद्वारे ट्राय ला विनंती केली आहे की, त्यांनी राष्ट्रीय प्रसारण धोरण तयार करण्यासाठी ट्राय कायदा 1997 च्या कलम 11 अंतर्गत विचारात घेतलेल्या सूचना प्रदान कराव्यात.
त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात, ट्राय ने राष्ट्रीय प्रसारण धोरण तयार करण्यासाठी विचारात घेण्यायोग्य सूचनांचा निपटारा करण्यासाठी, 21 सप्टेंबर 2023 रोजी विचारविनिमय-पूर्व पत्र जारी केले आहे. भागधारकांकडून मिळालेल्या सूचना आणि चर्चेच्या आधारावर, ट्राय ने 2 एप्रिल 2024 रोजी 'राष्ट्रीय प्रसारण धोरण-2024 च्या निर्मितीसाठी सूचना' या विषयावर सल्लामसलत निवेदन (कन्सल्टेशन पेपर) जारी केले. सल्लामसलत निवेदनामध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्याची क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून, त्यावर भागधारकांच्या सूचना मागवण्यासाठी 20 प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ट्राय ला सेवा प्रदाते, संस्था, उद्योग संघटना, ग्राहकांची बाजू मांडणारे गट आणि काही व्यक्तींसह 42 भागधारकांकडून सूचना प्राप्त झाल्या.
यावर 15 मे 2024 रोजी खुली चर्चा (ओडीएच) आयोजित करण्यात आली होती. ओडीएच नंतर काही अतिरिक्त सूचना देखील प्राप्त झाल्या. सूचना, ओडीएच चा अहवाल आणि अतिरिक्त सूचनांचे विश्लेषण करून सरकारला सादर करण्याच्या शिफारशी तयार करताना त्याचा विचार करण्यात आला.
प्रसारण क्षेत्र हे झपाट्याने उदयाला येणारे क्षेत्र असून, त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान देण्याची प्रचंड क्षमता आहे. प्रसारण धोरण तयार करण्यासाठीच्या सूचनांवरील शिफारशींनी उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या युगात देशातील प्रसारण क्षेत्राच्या नियोजित विकास आणि वाढीसाठी दृष्टी, ध्येय, उद्दिष्टे आणि धोरणे निश्चित केली आहेत.
प्रसारण क्षेत्राशी निगडित भागधारकांचे हित जपून, ग्राहकांना किफायतशीर दरात समृद्ध अनुभव प्रदान करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा त्वरित अवलंब करून या क्षेत्राच्या वाढीसाठी मदत करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारे, स्थानिक सरकारे आणि संस्था, दूरदर्शन आणि रेडिओ प्रसारक, ओटीटी सेवा प्रदाता, आशयसंपन्न सामग्री निर्माते, वितरक, उपकरण निर्माते, शिक्षण तज्ञ, संशोधन संस्था, स्टार्टअप आणि लघु आणि मध्यम उद्योगांसह उद्योग क्षेत्र, यासारख्या प्रमुख भागधारकांमध्ये सहकार्य आवश्यक आहे.
अधिक स्पष्टीकरण/माहितीसाठी, दीपक शर्मा, सल्लागार (B&CS), TRAI यांच्याशी ईमेल: (advbcs-2@trai.gov.in ) अथवा दूरध्वनी (+91-11-20907774) वर संपर्क साधता येईल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027122)
आगंतुक पटल : 136