माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रेकिंग बॅरियर्स : 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भारतीय सांकेतिक भाषेत आणि ध्वनी वर्णनासह चित्रपटांचे प्रदर्शन

Posted On: 19 JUN 2024 9:28PM by PIB Mumbai

मुंबई, 19 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) आज मुंबईमधील संस्कार धाम विद्यालय आणि व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी भारतीय सांकेतिक भाषेतील चित्रपटांच्या विशेष प्रदर्शनाचा आनंद घेतला. या विशेष प्रदर्शनामध्ये "लिटल कृष्णा," "द क्रॉसओवर," आणि "जय जगन्नाथ" चे भाग भारतीय सांकेतिक भाषेत आणि विशेष आवाजी वर्णनासह प्रदर्शित करण्यात आले.

   

या विशेष कार्यक्रमाला  इंडिया साइनिंग हँड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक केजरीवाल; आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक ब्रिज कोठारी; टून्झ मीडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अब्राहम उथुप;  नृत्यांगना आणि संशोधक मेथिल देविका; महोत्सव संचालक तसेच,  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रितुल कुमार;  आणि चित्रपट तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी श्रीराग एम  यांच्यासह उल्लेखनीय व्यक्तींची उपस्थिती लाभली.

या विशेष प्रदर्शनाला हजेरी लावणाऱ्या संस्कार धाम विद्यालय आणि व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंडमधील 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला.

संपूर्ण मिफ्फ आयोजक चमूला मिफ्फ 2024 मध्ये सर्वसमावेशकता आणि सहअनुभूतीची संस्कृती सुनिश्चित करण्यासाठी प्रथमच संवेदनशील आणि प्रशिक्षित करण्यात आल्याचे महोत्सव आयोजकांनी अधोरेखित केले. याशिवाय, दिव्यांगांना परिसरात सहज वावरता यावे यासाठी कार्यक्रम स्थळाची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामुळे या दिव्यांग व्यक्तींना महोत्सवातील चित्रपटांचा पूरेपूर आनंद घेता आला, असेही आयोजकांनी सांगितले.

या विशेष आयोजनासाठी एनएफडीसी आणि मिफ्फ च्या चमूने घेतलेल्या परिश्रमाची इंडिया साइनिंग हँड्सचे संस्थापक आलोक केजरीवाल यांनी प्रशंसा केली. चित्रपट पाहण्यासाठी मिफ्फ मध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

  

 

* * *

PIB Team MIFF | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane | 45

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026791) Visitor Counter : 99


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali