माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे दर्शन


यंदाच्या मिफ्फ मध्ये एफटीआयआय, एसआरएफटीआय सह देशभरातील चित्रपट प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 40 पेक्षा जास्त चित्रपटांचे प्रदर्शन

Posted On: 18 JUN 2024 6:05PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

18व्या मिफ्फ, म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने विद्यार्थी चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा चित्रपट प्रेमी आणि रसिकांपुढे सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यंदाच्या महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी भारतातील विविध चित्रपट प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उत्कृष्ट प्रकल्पांसह, एनएफडीसीने निर्मिती केलेले निवडक चित्रपट, आणि जर्मनी मधल्या कोनराड वुल्फ फिल्म युनिव्हर्सिटी ऑफ बेबल्सबर्गच्या विद्यार्थ्यांच्या स्पेशल स्टुडंट फिल्म पॅकेजची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ॲनिमेशन, फिक्शन आणि माहितीपटांसह विविध जॉनरच्या  चित्रपटांचा समावेश आहे.       

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चित्रपट पॅकेजमध्ये भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एसआरएफटीआय), व्हिसलिंग वुड्स, के आर नारायणन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअल सायन्स अँड आर्ट्स (केआरएनएनआयव्हीएएसए), एमजीआर फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट, ऑरोविल फिल्म इन्स्टिट्यूट, डीएलसीएसयुपीव्हीए रोहतक आणि एनआयडी अहमदाबाद, या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

एफटीआयआयचे विद्यार्थी प्रकल्प पुढील प्रमाणे:

  • पोचम्मा (मराठी) - विवेक अल्लाका दिग्दर्शित लघुपट (2022)
  • व्हॉइड अँड द ब्लूज (इंग्रजी आणि मल्याळम) - सिसिरा अनिल सीके द्वारे दिग्दर्शित माहितीपट (2023)
  • लॉस्ट इन टेलिपोर्टेशन (हिंदी) – तन्मय जेमिनी दिग्दर्शित लघुपट (2023)
  • खालती काय वरती काय (मराठी) – अदीप दास दिग्दर्शित माहितीपट (2023)
  • गोथो (कोंकणी) - साईनाथ उसकाईकर दिग्दर्शित माहितीपट (2023)
  • फ्लॉवरिंग मॅन (हिंदी) - सौम्यजित घोष दस्तीदार दिग्दर्शित लघुपट (2023)
  • डंप यार्ड (मराठी) – निखिल शिंदे दिग्दर्शित लघुपट (2023)
  • चंपारण मटन (हिंदी आणि वाजिका) - रंजन कुमार दिग्दर्शित लघुपट (2023)
  • 13 TWR (हिंदी आणि मराठी) – प्रशांत मोरे दिग्दर्शित लघुपट

 

एसआरएफटीआयचे विद्यार्थी प्रकल्प पुढील प्रमाणे:

  • नेव्हर से डाय (इंग्रजी) – दिया गंभीर यांचा माहितीपट
  • अपार (हिंदी) – अबिसोन युमनाम यांचा लघुपट  
  • डी-ग्रेड से ए-ग्रेड तक (हिंदी-मगही) – अनिकेत कुमार यांचा लघुपट
  • गुलमोहोर (मराठी, हिंदी, इंग्रजी) – दिग्विजय अंधोरीकर यांचा लघुपट
  • प्रोटो (इंग्रजी) – सोवन दत्ता यांचा ॲनिमेशनपट

 

ऑरोविल फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी प्रकल्प पुढील प्रमाणे:

  • मांडवी की मलम (हिंदी) – नकुल जैन यांचा लघुपट
  • एकेलॉन थ्रेड्स - अचिन फुलरे यांचा माहितीपट
  • शाक्यद: द इकोलॉजिकल बॉडी – शिल्पिका बोर्डोलोईचा लघुपट

 

व्हिसलिंग वुड्सचे विद्यार्थी प्रकल्प पुढील प्रमाणे:

  • नौहा (हिंदी आणि गढवाली) – प्रथम खुराना यांचा फिक्शन लघुपट
  • एक और बात (हिंदी) – वामिका सचर यांचा फिक्शन लघुपट

 

केआरएनएनआयव्हीएएसए चे विद्यार्थी प्रकल्प:

  • परदा (मल्याळम) - लया चंद्रलेखा यांचा लघुपट
  • द चूजिंग - थेरंजेडुप्पू (मल्याळम) - जिओ बेबी यांचा फिक्शन लघुपट
  • पॅटर्न्स (मल्याळम) – राज गोविंद व्ही यांचा लघुपट

 

एमजीआर फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चित्रपट प्रकल्प:

  • शॉर्ट टेल (तमिळ) -  एम. जी .  धनुष वर्धनन यांचा फिक्शन लघुपट
  • थ्री पीस लाइट (तमिळ) – टॉम जोस यांचा फिक्शन लघुपट
  • द फायनल कट (तमिळ) – धनुष राज यांचा लघुपट

 

एनआयडी अहमदाबादचे विद्यार्थी चित्रपट प्रकल्प:

  • दर्या (मराठी) – संजू कडू यांचा नाट्यमय चित्रपट ·     
  • घंटी (हिंदी, सिंधी, गुजराती) - उर्मिका वाधवा यांचा फिक्शन लघुपट

 

18 व्या मिफ्फ मध्ये प्रदर्शित केल्या जाणाऱ्या या विद्यार्थी चित्रपटांची निर्मिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) ने केली आहे :

  • आलम (इंग्रजी) – एसआरएफटीआय चा   विद्यार्थी आलोक कुमार याचा फिक्शन लघुपट
  • अंकुरन (इंग्रजी) – कबीर नाईक आणि नील चंपानेरी या दिग्दर्शक जोडीचा फिक्शन लघुपट
  • ला मेर (इंग्रजी) – एसआरएफटीआय चा   विद्यार्थी अरिजित पॉल याचा फिक्शन लघुपट
  • ओड (इंग्रजी) – एफटीआयआय चा  विद्यार्थी अखिल लोटलीकर याचा फिक्शन लघुपट
  • बिरवा (इंग्रजी) – जेएनयू चा माजी विद्यार्थी आणि एसआरएफटीआय चा विद्यार्थी निखिलेश मिश्रा याचा फिक्शन लघुपट    

कोनराड वुल्फ फिल्म युनिव्हर्सिटी ऑफ बेबल्सबर्गच्या मधून आलेल्या  चित्रपटांनी यापूर्वी जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये स्थान मिळवले आहे आणि पुरस्कार आणि प्रशंसा मिळवली आहे. फिल्म युनिव्हर्सिटीद्वारा निर्मित यापैकी काही चित्रपट जर्मन टीव्हीच्या सहकार्याने किंवा सह-निर्मिती  होते. 18 व्या मिफ्फ मध्ये पहिल्या दिवसापासून दाखवल्या जाणाऱ्या बॅबल्सबर्ग पॅकेजमध्ये खालील चित्रपटांचा समावेश आहे:

  • ॲश वेन्सडे (पोर्तुगीज): जोआओ प्राडो आणि बार्बरा सँटोस या दिग्दर्शक जोडीचा काल्पनिक लघुपट
  • प्रिजनर आउटसाइड: इगोर मेदवेदेव द्वारा दिग्दर्शित  आणि ॲनी-कॅथरीन सीमन द्वारा निर्मित ॲनिमेशनपट
  • व्हायब्रेशन्स (जर्मन): कॅडेन्झा झाओ द्वारा दिग्दर्शित माहितीपट
  • मस्करपोन (इंग्रजी): जोनास रीमरद्वारा दिग्दर्शित आणि जोहान्स शुबर्ट द्वारा निर्मित ॲनिमेशनपट
  • द टेस्टर (इंग्रजी, रोमानियन): सोफिया बिरेंड द्वारा दिग्दर्शित काल्पनिक लघुपट 
  • प्रिमिटिव्ह टाइम्स (चीनी): हाओ यू द्वारा दिग्दर्शित आणि ॲनी-कॅथरीन सीमन निर्मित ॲनिमेशनपट 
  • स्पॅटझेनहर्न: अरुण लिएंडर बौडोदिमोस द्वारा दिग्दर्शित ॲनिमेशनपट  
  • स्टेन्ड स्किन (इंग्रजी): ॲडमग्राफ आणि मँडी पीटरेट  या दिग्दर्शक जोडीचा काल्पनिक लघुपट
  • इसस्पिन, द ओह सो टेरिबल (जर्मन): ॲड्रियन डॉल द्वारा दिग्दर्शित आणि लुकास कोल द्वारा  निर्मित ॲनिमेशनपट 
  • इन अँड आऊट (जर्मन): जॅन ओक जेन्सद्वारा दिग्दर्शित काल्पनिक लघुपट
  • क्रेझी ब्लड (जर्मन, तुर्की): दिग्दर्शक कॅन टॅनियोलचा काल्पनिक लघुपट
  • क्रस्ट (जर्मन): जेन्स केविन जॉर्जचा काल्पनिक लघुपट

 

* * *

PIB Team MIFF | N.Chitale/Rajshree/Sushma/D.Rane | 32

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026246) Visitor Counter : 24