माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘माय मर्क्युरी’ माहितीपट प्रदर्शित, मर्क्युरी बेटावरील संवर्धनाचा मागोवा घेणारा माहितीपट
‘माय मर्क्युरी’ माहितीपटात दर्शविण्यात आलेल्या सर्व घटना खऱ्या - दिग्दर्शक जोएल चेस्लेट
Posted On:
17 JUN 2024 1:10PM by PIB Mumbai
मुंबई, 17 जून 2024
18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन विभागात "माय मर्क्युरी" या माहितीपटाचे मोठ्या पडद्यावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन करण्यात आले. जोएल चेसेलेट यांच्याद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट, दक्षिण आफ्रिकेच्या नामिबियाच्या किनारपट्टीवरील मर्क्यूरी बेटाचा एकटा संरक्षक असलेला त्यांचा भाऊ यवेस चेसलेटच्या जीवनातील एक गंभीर वैयक्तिक आणि आव्हानात्मक प्रवास प्रदर्शित करतो.
"एखाद्या बेटावर राहण्यासाठी, तुम्हाला एका विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्त्व लाभणे आवश्यक आहे," असे मत चेसलेट यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावाची जगातील कोलाहल आणि गर्दीतून सुटका मिळवण्याची इच्छा अधोरेखित केली. 104-मिनिटांचा हा माहितीपट, यवेस चेसलेटच्या विलक्षण जगात आपल्याला घेऊन जातो आणि जेथे केवळ समुद्री पक्षी आणि सील त्याचे एकमेव साथीदार बनतात अशा मर्क्यूरी बेटावरील संवर्धनाचे त्याचे प्रयत्न प्रदर्शित करतो. लुप्तप्राय प्रजातींना या बेटावर पुन्हा संबंधित करण्याची त्याची ही धाडसी मोहीम बलिदान, विजय तसेच मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील अतुट बंधांची एक मनमोहक कथा आपल्यासमोर उलगडते. हा चित्रपट लुप्त होत चाललेले समुद्री पक्षी आणि सीलमुळे अस्तित्वाला धोका निर्माण झालेल्या इतर वन्यप्राण्यांच्या ऱ्हासाचा अभ्यास करतो. अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 15 जून ते 21 जून 2024 या कालावधीत मुंबईतील पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-फिल्म विभागाच्या आवारात संपन्न होत आहे.
चेसलेटने "माय मर्क्युरी" चे वर्णन पर्यावरण-मानसशास्त्रीय माहितीपट म्हणून केले आहे. हा माहितीपट मानवाच्या जटिल मानसिकतेचे आणि मानवाचे निसर्गाशी आमचे आनंददायक नाते प्रदर्शित करतो. "एक बेट म्हणजे एक मर्यादित आणि आव्हानात्मक जागा असते," असे चेसलेट यांनी नमूद केले. असे वातावरण मानसिकदृष्ट्या अतिशय थकवणारे असू शकते, असेही त्या म्हणाल्या. "चित्रपटात दर्शविण्यात आलेल्या सर्व घटना खऱ्या" असल्याचे चेसलेट ठामपणे सांगतात. गहाळ फुटेजच्या जागी फक्त काही पुनर्रचना करण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
माहितीपटाचा केंद्रबिंदू मर्क्यूरी बेट, हा याच्या नायकाचा "आत्मा” म्हणून चित्रित केला आहे. जो नायकाच्या प्रयत्नांमुळे स्वर्गात रूपांतरीत झाला आहे. चित्रपटाचे शीर्षक, “माय मर्क्युरी”, त्याचे बेटाशी असलेले हे घनिष्ठ संबंध प्रतिबिंबित करते.
चेसलेट पर्यावरणीय समतोलामध्ये मानवी आणि गैर-मानवी परस्परसंवादांमधील जटिल परस्परसंबंध अधोरेखित करते. "या समतोलातून माणसाला काढून टाकल्यामुळे सीलची संख्या वाढण्यावर आणि समुद्री पक्षी कमी होण्यावर परिणाम झाला," असे त्यांनी स्पष्ट केले. जास्त मासेमारी देखील समस्येला कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. हा माहितीपट लोकांना वरवरच्या राजकीय चिंतांच्या पलीकडे जाऊन पर्यावरणाच्या मुद्द्यांवर अधिक जागरूकता आणि कृती करण्याचे आवाहन करतो. "नैसर्गिक जगाचे वर्णन करताना भावनात्मकता ही विधायक असतेच असे नाही. अति सूक्ष्म आणि सुक्ष्म अशा दोन्ही संवेदनांमध्ये जागरूकता महत्त्वाची आहे," असेही त्या म्हणाल्या.
चित्रपटाचा संवेदनशील विषय लक्षात घेता, चेसलेट यांनी चित्रपट उद्योगाची सनसनाटी निर्माण करण्याची प्रवृत्ती अधोरेखित केली. "हा एक हृदयस्पर्शी विषय असल्याने आणि नायक माझा स्वतःचा भाऊ असल्याने, मला काळजीपूर्वक मार्गक्रमण करावे लागेल," असे त्या म्हणाल्या.
या माहितीपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक लॉयड रॉस यांनी सील हाताळण्याच्या नायकाच्या पद्धतींमुळे चित्रपटाला आलेले विवादास्पद स्वरूप प्रतिध्वनित केले. असे असतानाही निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांनी माहितीपटाला जोरदार पाठिंबा दिला आहे. रॉसने बेटावरील चित्रीकरणाच्या तार्किक आव्हानांचे वर्णन केले, "किना-याला समुद्रकिनारा नसल्यामुळे आणि सर्वत्र खडक असल्यामुळे बेटावर जाणे खूप कठीण होते," असे सांगितले.
“माय मर्क्युरी” हा माहितीपट केवळ संवर्धनाच्या गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकतो असे नाही तर निसर्गाशी असलेल्या मानवी संबंधाचाही अभ्यास करतो.
* * *
PIB Team MIFF | H.Akude/S.Mukhedkar/D.Rane | 21
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025862)
Visitor Counter : 89