रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद
एकाच दिवशी अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या सार्वजनिक सेवेच्या कार्यक्रमाला सर्वाधिक लोकांनी हजेरी लावण्याचा भारताचा विक्रम
Posted On:
15 JUN 2024 8:18PM by PIB Mumbai
एकाच दिवशी अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक सेवेच्या कार्यक्रमाला सर्वाधिक लोकांनी हजेरी लावण्याचा विक्रम नोंदवल्याबद्दल, भारतीय रेल्वेची नोंद प्रतिष्ठेच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
रेल्वे मंत्रालयाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये 2,140 ठिकाणी 40,19,516 लोक उपस्थित होते.
हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे मार्गावरून/खालून जाणाऱ्या पुलांचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभरणीसाठी आयोजित करण्यात आला होता.
एकाच वेळी अनेक जणांना एकत्र आणण्याच्या या प्रयत्नांची दखल घेतली गेली, आणि भारतीय रेल्वेला प्रतिष्ठेच्या लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले.
***
M.Pange/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025629)
Visitor Counter : 99