रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रसायने आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या अध्यक्षतेखाली औषध निर्माण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन

Posted On: 15 JUN 2024 4:50PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रसायने आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि राज्यमंत्री (रसायने आणि खत) अनुप्रिया पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आज औषध निर्माण (फार्मास्युटिकल्स) विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागाने फार्मा आणि मेडीटेक (वैद्यक-तंत्रज्ञान) क्षेत्राचा तपशीलवार आढावा सादर केला, आणि नियामक चौकट आणि विभागाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांसह, विविध उपक्रमांबाबत सविस्तर सादरीकरण केले.

केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या विकसित भारत @ 2047 दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली, तसेच पंचवार्षिक उद्दिष्ट आणि 100 दिवसांच्या कृती आराखड्याचाही आढावा घेतला. पंचवार्षिक योजने अंतर्गत औषध सुरक्षा वाढवण्यावर, तसेच वैद्यकीय उपकरणांमधील आत्मनिर्भरता, जनऔषधी योजनेचा विस्तार आणि औषधे आणि उपचार नागरिकांना परवडण्याजोगे बनविण्यावर भर दिला जाईल. केंद्रीय मंत्र्यांनी गुणवत्तेकडे नव्याने लक्ष केंद्रित करण्याचे, तसेच पुढील तीन वर्षांमध्ये औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या सर्व कारखान्यांची जागतिक दर्जानुसार श्रेणी सुधारणा करण्याचे निर्देशही दिले. 

***

M.Pange/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2025558) Visitor Counter : 94