ग्रामीण विकास मंत्रालय
ग्रामीण विकास आणि कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या पुढील 100 दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात घेतली बैठक
आगामी 100 दिवसांचा कृती आराखडा मजबूत आणि प्रभावी पद्धतीने राबवण्यावर ग्रामविकास मंत्र्यांचा भर
आपल्याला प्रत्येक समस्या गांभीर्याने घ्यायची आहे आणि यासाठी योजनेचे नियम आणि अटी बदलायची गरज असेल तर तशा सुधारणाही केल्या जातील - शिवराज सिंह चौहान
Posted On:
15 JUN 2024 3:18PM by PIB Mumbai
केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संध्याकाळी मंत्रालयाच्या विविध योजनांच्या आगामी 100 दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात बैठक घेतली. पुढल्या 100 दिवसांचा हा कृती आराखडा मजबूत आणि प्रभावी पद्धतीने राबवण्यावर ग्रामविकास मंत्र्यांनी भर दिला. ग्रामीण विकासाच्या प्रत्येक योजनेवर आपण सर्वांनी मिळून पूर्ण ताकदीने काम करायला हवे, तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमावर चर्चा करताना त्यांनी नमूद केले की आपल्याला वृद्ध, विधवा आणि अपंगांच्या आदर्श जीवनासाठी प्रकल्पाची आखणी करायची आहे आणि यासाठी आपल्याला प्रत्येक समस्या गांभीर्याने हाताळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी योजनेचे नियम आणि अटी बदलण्याची गरज भासली तर त्यात सुधारणाही केल्या जातील.
जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समित्यांच्या (दिशा) महत्त्वावर भर देत ते म्हणाले की दिशा समित्यांना आणखी मजबूत करण्याची गरज आहे, आणि यासाठी ते सर्व नवनिर्वाचित खासदारांना पत्र लिहून दिशा समित्यांच्या बैठका वेळेवर घेतल्या जातील याची खातरजमा करण्यासाठी विनंती करतील, जेणेकरून प्रत्येक छोटी समस्या आणि प्रगतीकडे सातत्याने लक्ष देता येईल.
या बैठकीला ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, कमलेश पासवान, ग्रामीण विकास सचिव शैलेश कुमार सिंह आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2025551)
Visitor Counter : 126