वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला


युवकांसाठी नवीन संधी निर्माण करण्याबरोबरच सर्व नागरिकांच्या हितासाठी अविरत कार्यासाठी सरकार वचनबद्ध : गोयल

Posted On: 11 JUN 2024 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2024

 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री जितिन प्रसाद; वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल तसेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुन्हा एकदा देशसेवेची संधी दिल्याबद्दल गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी मनःपूर्वक आभार मानले. गेल्या दशकभरात पंतप्रधान मोदींच्या विकासाभिमुख भक्कम कारभारामुळे देशभरात प्रगतीची लाट आली आहे आणि या पायावर विकास करणे अत्यावश्यक आहे, असे गोयल म्हणाले.

वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रात जलद प्रगतीसाठी अमृत काळात परिश्रमपूर्वक काम करण्याच्या महत्त्वावर गोयल यांनी भर दिला. तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. "सबका साथ, सबका प्रयास" या तत्वज्ञानाचा स्वीकार केल्याने सामूहिक प्रयत्न आणि विश्वास भारताला उज्वल भविष्याकडे घेऊन जातील, असेही त्यांनी नमूद केले.

 


S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2024405) Visitor Counter : 94