राष्ट्रपती कार्यालय
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
Posted On:
10 JUN 2024 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,10 जून 2024
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू यांनी आज (10 जून, 2024) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
राष्ट्रपती डॉ. मोईज्जू यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना, राष्ट्रपती मुर्मू यांनी नवीन सरकार आणि मालदीवच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रपती डॉ. मोईज्जू यांच्या नेतृत्वाखाली मालदीव समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
उभय नेत्यांनी दोन देशांमधील दीर्घकालीन आणि बहुआयामी संबंध नमूद करून लोकांमधील परस्पर संबंध, क्षमता बांधणी सहकार्य, आर्थिक आणि व्यापारी संबंध आणि विकास सहकार्य यासह व्यापक द्विपक्षीय सहकार्याच्या महत्वाच्या स्तंभांवर प्रकाश टाकला.
आगामी काळात भारत-मालदीव संबंध अधिक दृढ होतील,अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023837)
Visitor Counter : 72