संरक्षण मंत्रालय
गया येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्या 25 व्या पासिंग आऊट परेडला लष्कर उपप्रमुख उपस्थित
Posted On:
08 JUN 2024 7:11PM by PIB Mumbai
गया येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीची रौप्य महोत्सवी (25 वी) पासिंग आउट परेड 8 जून 2024 रोजी संपन्न झाली. या संचलनामध्ये एकूण 118 अधिकारी कॅडेट्स अंतिम पग पार करून भारतीय सैन्य आणि आसाम रायफल्समध्ये कमिशन्ड ऑफिसर बनले. या कार्यक्रमात विशेष कमिशन्ड अधिकारी अभ्यासक्रमाचे (अनुक्रमांक 52) 58 अधिकारी कॅडेट्स अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. यामध्ये आसाम रायफल्सच्या 15 जणांचा आणि तांत्रिक प्रवेश योजनेतील (अनुक्रमांक 43) 60 जणांचा समावेश आहे. त्याची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे :
लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे या संचलनाला निरीक्षण अधिकारी म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कॅडेट्सना सैन्य उपप्रमुखांनी पदके प्रदान केली.
युवा लष्करी अधिकाऱ्यांनी सैन्याची मूल्ये, परंपरा आणि नैतिकता जपण्याचे आवाहन, निरीक्षण अधिकाऱ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अधिकारी कॅडेट्सना संबोधित करताना केले. मातृभूमीच्या शूर सैनिकांनी शांतता काळात तसेच युद्धात नेतृत्व करताना करुणेला व्यावसायिक कौशल्याची जोड देण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023636)
Visitor Counter : 77