उपराष्ट्रपती कार्यालय
गेल्या सहा दशकांत पहिल्यांदाच एका पंतप्रधानांना तिसरा कार्यकाळ मिळाला आहे - उपराष्ट्रपती
जेव्हा संदेह वाटेल तेव्हा भारतीय राज्यघटनेतील मजकूराचा संदर्भ घ्या -उपराष्ट्रपती
Posted On:
07 JUN 2024 6:09PM by PIB Mumbai
1962 पासून पहिल्यांदाच एका पंतप्रधानाना तिसरा कार्यकाळ मिळाल्याचे उद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज काढले. या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या ऐतिहासिक महत्वाची दखल घेतानाच अशी कामगिरी क्वचितच आढळते यावर त्यांनी भर दिला.
राज्यसभा इंटर्नशीप कार्यक्रमातील सहभागींशी संवाद साधताना ते बोलत होते. समाजमाध्यमांची ताकद वापरून मतं व्यक्त करा आणि अपायकारक प्रवृत्तींपासून सावध रहा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. विधायक वादविवाद, संवाद आणि चर्चेची विकासात सकारात्मक भूमिका असते या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. विधायक भूमिकेपासून कोणी फारकत घेत असेल तर जनमत जागवण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारत हा महाकाय सुस्त देश नव्हे तर दिवसागणिक आणि प्रत्येक क्षणी प्रगती करणारा देश असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा संदेह असेल तेव्हा भारतीय राज्यघटनेतील मजकूर संदर्भासाठी पहा असे त्यांनी सांगितले.
इंटर्नशिप कार्यक्रम हा "संसदीय स्टार्टअप" असून तो एक नवीन दिशा देईल आणि देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यास उद्युक्त करेल, असे धनखड म्हणाले. संसद सदस्य नसतानाही अप्रत्यक्षपणे नागरिक लोकशाही प्रक्रियेत कसे सहभागी होऊ शकतात आणि याचिकांच्या माध्यमातून सार्वजनिक समस्या कशा मांडू शकतात याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.



***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2023523)
Visitor Counter : 120