वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

हिंद-प्रशांत क्षेत्र समृद्धी आर्थिक आराखडा (आयपीईएफ) स्वच्छ अर्थव्यवस्था गुंतवणूकदार मंचाच्या उद्घाटन कार्यक्रमात भारत सहभागी

Posted On: 06 JUN 2024 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

हिंद-प्रशांत क्षेत्र समृद्धी आर्थिक आराखडा (आयपीईएफ) स्वच्छ अर्थव्यवस्था गुंतवणूकदार मंचाच्या उद्घाटन कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ सहभागी झाले. भारत – प्रशांत क्षेत्रातील उत्तमोत्तम गुंतवणुकदार, स्वच्छ अर्थव्यवस्था कंपन्या आणि दीर्घकालीन फायदेशीर पायाभूत सुविधांच्या निर्मिती, हवामान तंत्रज्ञान आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना एकत्र आणण्यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

A group of people sitting on a stageDescription automatically generated

हिंद –प्रशांत क्षेत्रात दीर्घकालीन फायदेशीर पायाभूत सुविधांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे जागतिक गुंतवणुकदार, प्रकल्प निर्माते, धोरणकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्र यांना एकाच छताखाली आणणारे हे खास व्यासपीठ असल्याचे वाणिज्य सचिव बर्थवाल यांनी सांगितले. ‘आयपीईएफ’च्या स्वच्छ अर्थव्यवस्था मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारतात स्वच्छ ऊर्जा मूल्य साखळीत अपारंपरिक पर्यायांसह, हायड्रोजन आणि विद्युत वाहने व त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी  500 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीला संधी असल्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. गेल्या दशकभरात भारताने व्यवसाय  सुलभता आणण्यासाठी घडवून आणलेल्या बदलांची त्यांनी माहिती दिली.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमात आयपीईएफचे भागीदार असलेल्या आर्थिक संस्था, बहुआयामी विकास बँका, उपक्रम भांडवलदार, प्रकल्प मालक, नवोद्योजक आणि सरकारी विभागांच्या प्रतिनिधींनी हवामान तंत्रज्ञान गुंतवणूक व पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सक्रीय सहभाग नोंदवला.

A group of men holding papersDescription automatically generated

या मंचाद्वारे प्रथमच हिंद–प्रशांत क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणीसाठी 23 अब्ज अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीच्या संधी समोर आल्या. मंचाच्या भागिदारांच्या सहयोगाने आगामी वर्षांमध्ये 25 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे भांडवल या प्रदेशात उभे राहील, असा अंदाज आहे.

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023229) Visitor Counter : 52