ऊर्जा मंत्रालय

नेपाळमधील अरुण-3 जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या हेड रेस टनेलच्या खोदकामासाठी नेपाळच्या पंतप्रधानांच्या हस्ते शेवटच्या स्फोटाची प्रक्रिया

Posted On: 05 JUN 2024 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2024

 

नेपाळमध्ये संखुवासभा जिल्ह्यात 900 मेगाव़ॉटच्या अरुण-3 जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या 11.8 किमी लांबीच्या हेड रेस टनेलचे खोदकाम पूर्ण करणारा शेवटचा स्फोट करण्याची प्रक्रिया नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंड यांच्या हस्ते झाली. एसजेव्हीएन  अरुण-3 पॉवर डेव्हलपमेंट कंपनी प्रा. लि. (SAPDC) या एसजेव्हीएन या कंपनीची संपूर्ण मालकी असलेल्या उपकंपनीकडून अरुण-3 जलविद्युत निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. एसएपीडीसी हा एसजेव्हीएन आणि नेपाळ सरकार यांच्यामधील अतिशय महत्त्वाचा सहकार्य प्रकल्प असून, या प्रदेशातील प्रादेशिक ऊर्जा सुरक्षेत वाढ करणे आणि अरुण नदी खोऱ्यात शाश्वत जलविद्युत निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. 

   

या कार्यक्रमाला नेपाळच्या पंतप्रधानांनी संबोधित केले.  स्वच्छ, नूतनक्षम ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या उद्दिष्टाच्या आणखी जवळ नेणारा आणि या प्रदेशाच्या शाश्वत विकासामध्ये योगदान देणारा हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. 

   

यावेळी भारताचे नेपाळमधील राजदूत नवीन श्रीवास्तव उपस्थित होते. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यात गेल्या वर्षी नेपाळमधून वीज आयात करण्याच्या दीर्घकालीन ऊर्जा व्यापार करारावरील सहमतीची आठवण करून दिली. निर्यातीच्या उद्देशाने वीजनिर्मिती करणाऱ्या या 900 मेगावॉट अरुण-3 जलविद्युत निर्मिती प्रकल्पाची पूर्तता या करारासाठी एक महत्त्वाचा टप्पा असेल, असे ते म्हणाले. 

   

सध्या एसजेव्हीएन नेपाळमधील अरुण नदी खोऱ्यात 2200 मेगावॉट क्षमतेच्या तीन जलविद्युत निर्मिती प्रकल्पांची उभारणी करत आहे. 

 

* * *

S.Kakade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022854) Visitor Counter : 49