कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत मे 2024 मध्ये कोळशाच्या उत्पादनात 10.15% तर वितरणात 10.35% ने वाढ

Posted On: 03 JUN 2024 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जून 2024

 

मे 2024 मध्ये, भारताचे कोळसा उत्पादन 83.91 दशलक्ष टन (तात्पुरते) पर्यंत पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या समान कालावधीतील 76.18 दशलक्ष टनाच्या तुलनेत 10.15% वाढ दर्शवते. या कालावधीत, कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने 64.40 दशलक्ष टन (तात्पुरते) कोळसा उत्पादन साध्य केले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या 59.93 दशलक्ष टनाच्या तुलनेत 7.46% ची वाढ दर्शवते. याव्यतिरिक्त, मे 2024 मध्ये कॅप्टिव्ह आणि इतर संस्थांद्वारे कोळसा उत्पादन 13.78 दशलक्ष टन (तात्पुरते) होते, जे मागील वर्षाच्या 10.38 दशलक्ष टनाच्या तुलनेत 32.76% जास्त आहे.  

त्याचप्रमाणे, मे 2024 मध्ये भारतातील एकूण कोळसा वितरण 90.84 दशलक्ष टन  (तात्पुरते) वर पोहोचले जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील 82.32 दशलक्ष टनाच्या तुलनेत 10.35% ने जास्त आहे. मे 2024 मध्ये, सीआयएल ने 69.08 एमटी (तात्पुरते) कोळसा वितरण केले जे गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या 63.67 दशलक्ष टनाच्या तुलनेत 8.50% वाढ दर्शवते. याव्यतिरिक्त, मे महिन्यात कॅप्टिव्ह आणि इतर संस्थांद्वारे कोळसा वितरण 16 दशलक्ष टन (तात्पुरते) नोंदवले गेले, जे मागील वर्षाच्या 12.37 एमटीच्या तुलनेत 29.33% ने अधिक आहे. 

कोळसा कंपन्यांकडे एकूण 96.48 दशलक्ष टन इतका कोळशाचा साठा आहे. सीआयएलकडे कोळशाचा साठा 83.01 एमटी आहे, तर कॅप्टिव्ह आणि इतर कंपन्यांकडे 8.28 दशलक्ष टन इतका साठा आहे.

 

* * *

S.Kakade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022650) Visitor Counter : 72