संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाचे जहाज शिवालिक सिंगापूरहून रवाना


JIMEX 24 आणि RIMPAC 24 मध्ये होणार सहभागी

Posted On: 01 JUN 2024 3:33PM by PIB Mumbai

 

आयएनएस शिवालिक हे दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत  महासागरात तैनात करण्यात आलेले भारतीय नौदलाचे जहाज, 30 मे 2024 रोजी सिंगापूरहून जपानच्या योकोसुका येथे जाण्यासाठी निघाले.

सिंगापूर येथे जहाजाच्या थांब्यादरम्यान  विविध उपक्रम हाती घेण्यात आले ज्यात चांगी नौदल तळावरील बेस कमांडर यांची भेट, क्रांजी युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र  अर्पण करणे सिंगापूरमधील भारताच्या उच्चायुक्तांशी भेट, आयएफसी भेट, जहाजावरील सुमारे 80 शाळकरी मुलांची आयएनएस शिवालिकला भेट भारतीय आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांची जहाजावरील भेट तसेच युएसएस मोबाईल (LCS) ला क्रॉस-डेक भेटी यांचा समावेश होता. या भेटी प्रामुख्याने या क्षेत्रामध्ये सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासच्या कक्षेत येणारे सागरी संबंध आणि नौदलांमधील सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करतात.

आयएनएस शिवालिक, सिंगापूरहून निघाल्यावर, JIMEX 24 आणि RIMPAC 24 मध्ये सहभागी होणार आहे. या तैनातीचा उद्देश JMSDF, अमेरिकन नौदल आणि RIMPAC 24 मध्ये सहभागी होणाऱ्या इतर भागीदार नौदलांसोबत आंतरपरिचालन क्षमता वाढवणे हा आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022448) Visitor Counter : 85