संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या अत्याधुनिक अपतटीय  गस्ती नौकेच्या बांधणीसाठी  प्रारंभिक प्रक्रिया सुरु करण्याचा समारंभ मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे संपन्न

Posted On: 31 MAY 2024 6:25PM by PIB Mumbai

 

मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे आज 31 मे 2024 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्या नेक्स्ट-जनरेशन अर्थात अत्याधुनिक  अपतटीय गस्ती नौकेसाठीच्या स्टील कटिंग म्हणजेच बांधणीसाठीचा  प्रारंभिक प्रक्रिया सुरु करण्याचा समारंभ झाला. संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर 2023 मध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी सुमारे 1,614.89 कोटी रुपये  किमतीच्या सहा अत्याधुनिक  अपतटीय गस्ती नौकांच्या खरेदीसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत करार केला होता.  या प्रकल्पाचे उद्दिष्ट तटीय आणि अपतटीय गस्तीची क्षमता वाढवणे, सागरी क्षेत्रांचे रक्षण करणे आणि कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवणे हे आहे.

या  गस्ती नौका अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांनी सुसज्ज आहेत. या नौका दोन डिझेल इंजिनांनी सज्ज असून त्या जास्तीत जास्त 23 नॉट्सचा कायम वेग प्राप्त करत सुमारे 5,000 सागरी  मैलांपर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहेत.  शिवाय, या नौकांवर अविभाज्य दुहेरी -इंजिन हेलिकॉप्टर सुविधा असून यावर जड हेलिकॉप्टरसाठी स्थान, जलद आणि प्रभावी हवाई निरीक्षण आणि प्रतिसाद क्षमता सक्षम करण्यात आली आहे.  बहुउद्देशीय ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता आणि वायरलेसने नियंत्रित जल बचाव यान  यासारखी प्रगत वैशिष्ट्ये अंतर्भूत असलेल्या एनजीओपीव्ही गस्ती नौका भारतीय तटरक्षक दलाला  अतुलनीय लवचिकता आणि अत्याधुनिक कार्यान्वयनाची सुविधा प्रदान करतात.

या गस्ती नौका मे 2027 पर्यंत तयार असल्याचे नियोजित करण्यात आले आहे. या गस्ती नका भारतीय तटरक्षक दल, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड  आणि प्रकल्पात सहभागी असलेल्या इतर भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असतील.  एनजीओपीव्ही गस्ती नौका प्रकल्प देशाची आत्मनिर्भरता  आणि स्वदेशी उत्पादनाची बांधिलकी अधोरेखित करतो.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022401) Visitor Counter : 59


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil