सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2023-24 च्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनाचा तात्पुरता अंदाज आणि 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा त्रैमासिक अंदाज


2023-24 या आर्थिक वर्षाच्या  वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनात , 2022-23 या आर्थिक वर्षातील 7.0% च्या तुलनेत  8.2% वृद्धीचा  अंदाज

Posted On: 31 MAY 2024 5:30PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) पुढील निवेदनाद्वारे, स्थिर आणि वर्तमान  दोन्ही किंमतींवरील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) खर्चविषयक घटकांच्या संबंधित अंदाजांसह, 2023-24 साठी सकल राष्ट्रीय उत्पादनाचा तात्पुरता अंदाज (पीई) आणि 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी (Q4 2023-24) सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) त्रैमासिक अंदाज जारी करत आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

2023-24 या आर्थिक वर्षाच्या  वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनात 2022-23 या आर्थिक वर्षातील 7.0%च्या तुलनेत  8.2%नी वृद्धीचा  अंदाज. 2022-23 या आर्थिक वर्षातील 14.2% वृद्धी दराच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात नॉमिनल जीडीपीचा वृद्धी दर9.6%राहिला आहे.

2022-23 या आर्थिक वर्षातील 6.7% च्या तुलनेत वास्तविक सकल मूल्य संवर्धन  जीव्हीए 7.2% नी वाढला आहे. जीव्हीएमधील ही वाढ मुख्यत्वे 2022-23 मधील -2.2% च्या तुलनेत उत्पादन क्षेत्रातील 9.9% या लक्षणीय वाढीमुळे आणि 2022-23 मधील खाणकाम आणि खनन क्षेत्रातील 1.9% च्या तुलनेत 2023-24 मधील 7.1% वृद्धीमुळे झाली आहे.

2023-24 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीमध्ये वास्तविक जीव्हीए 6.3% आणि वास्तविक जीडीपी 7.8% दराने वाढण्याचा अंदाज आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात नॉमिनल जीव्हीए 8.0% आणि नॉमिनल जीडीपी 9.9% राहण्याचा अंदाज आहे.

पीडीएफ स्वरुपात हे प्रसिद्धी पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2022397) Visitor Counter : 186


Read this release in: Hindi , Tamil , Khasi , English , Urdu