भूविज्ञान मंत्रालय
भारताने 46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे (एटीसीएम-46) तसेच 26 व्या पर्यावरण संरक्षण समितीचे (सीईपी-26) केले यशस्वी आयोजन.
भारताने 20 मे ते 30 मे 2024 या कालावधीत केरळमधील कोची येथे 46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे (एटीसीएम -46) तसेच 26 व्या पर्यावरण संरक्षण समितीचे (सीईपी -26) यशस्वी आयोजन केले.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी अंटार्क्टिक संशोधन केंद्र मैत्री-II स्थापन करण्याच्या भारताच्या योजनेची घोषणा केली.
Posted On:
31 MAY 2024 2:31PM by PIB Mumbai
अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक - 46 चे आयोजन ‘वसुधैव कुटुंबकम’ या व्यापक संकल्पनेवर आधारित होते. ‘वसुधैव कुटुंबकम’ चा अर्थ एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य असा होतो. ही संकल्पना शांतता, वैज्ञानिक सहकार्य आणि मानवजातीसाठी अंटार्क्टिकाचे संरक्षण करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अंटार्क्टिक करार प्रणालीला प्रतिध्वनीत करते.
46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे तसेच 26 व्या पर्यावरण संरक्षण समितीचे आयोजन भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाने गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र तसेच अर्जेंटिना येथे मुख्यालय असलेल्या अंटार्क्टिक संधि सचिवालयाच्या सहकार्याने केले होते.
20 ते 24 मे 2024 या कालावधीत आयोजित 26 व्या पर्यावरण संरक्षण समिती मध्ये अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले आणि अंटार्क्टिकामधील पर्यावरण नियमावलीच्या अंमलबजावणीमध्ये योगदान देण्यात आले. समितीने समुद्रातील हिम बदलांचे व्यवस्थापन परिणाम, प्रमुख उपक्रमांचे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन वाढवणे, पेंग्विनचे संरक्षण करणे आणि अंटार्क्टिकामधील पर्यावरण निरीक्षणासाठी आंतरराष्ट्रीय आराखडा विकसित करणे यावर आणखी काम करण्याला प्राधान्य देण्याचे मान्य केले.
ATCM-46 चिन्हांकित मायस्टॅम्पचे प्रकाशन.
भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने ATCM-46 बोधचिन्ह असलेले विशेष टपाल तिकीट ‘मायस्टॅम्प’ या कार्यक्रमात जारी करण्यात आले.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022308)
Visitor Counter : 114