संरक्षण मंत्रालय
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा आणि आयआयटी हैदराबाद यांनी संशोधन सहकार्य आणि प्रशिक्षणासाठी केला सामंजस्य करार
Posted On:
30 MAY 2024 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2024
आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस अर्थात सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा यांनी संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
अभिनव वैद्यकीय उपकरणे विकसित करण्यासाठी आणि विविध ठिकाणी सेवा बजावत असलेल्या सैनिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवोन्मेष आणि संशोधनाला चालना देणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. हैदराबाद येथील आयआयटीचे जैव तंत्रज्ञान, जैव वैद्यकीय अभियांत्रिकी आणि जैव माहिती तंत्रज्ञान हे विभाग सशस्त्र दलांना भेडसावणाऱ्या वैविध्यपूर्ण वैद्यकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक कौशल्य प्रदान करतील.
या करारात चर्चा केलेल्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ड्रोन-आधारित रुग्ण वाहतूक, टेलिमेडिसिन नवोन्मेष, वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नॅनो तंत्रज्ञानातील प्रगती यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, सामंजस्य करारानुसार विद्यार्थी विनिमय कार्यक्रम, पदवीधरांसाठी अल्प-मुदतीचे अभ्यासक्रम आणि शिक्षकवृंद विनिमय उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे.
लष्करी कर्मचाऱ्यांचे आरोग्य संवर्धन आणि कल्याण साधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान तसेच संशोधनाचा लाभ घेण्याच्या मार्गावर हे सहकार्य एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022247)
Visitor Counter : 98